रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर दोन महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असताना चारचाकी गाडीची धडक बसल्याने एका बेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असुन याबाबत मेघा राजाराम फंड, (वय 40) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. या अपघातानंतर वाहनचालक महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द, ता.शिरुर, जि. पुणे) हा पळुन गेला आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात एका मित्राचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याने घेतला गळफास…

शिरूर (तेजस फडके) : धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर विहिरीवर पोहायला गेलेल्या एका युवकाचा कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला; तर या घटनेचा धसका घेऊन त्याच्या एका घाबरलेल्या मित्राने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलिसांनी स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर; चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याने कारचालकास एक वर्षाचा कारावास

मांडवगण फराटा (संपत कारकुड) सात वर्षांपुर्वी एका कार चालकाने बेफिकरीने गाडी चालविल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्या चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या आरोपीस शिरुर न्यायालयाने एक वर्षाचा कारावास आणि २५ हजार रुपये दंड शिरुर ठोठावला असुन नानासाहेब गुलाबराव फलके (रा. पिंपळसुटी, ता.शिरुर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.   मांडवगण फराटा येथील धनंजय […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…

दबंग उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या कामगिरीकडे तालुक्याचे लक्ष.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील संस्था अध्यक्षासह अन्य पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ, आर्थिक लाभापासून वंचित ठेवून, दबाव दमदाटी करून […]

अधिक वाचा..

धक्कादायक; फिर्यादीच निघाला खुनातील आरोपी, चुलत भावानेच केला भावाचा खुन…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील बाबुरावनगर येथील श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी नगर-पुणे रस्त्यावर भैरवनाथ कृपा सहकारी गृह रचना मर्यादित शिरुर या ठिकाणी वास्तव्यात असलेले काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मोहताब शाहिद आलम या युवकाचा (दि १८) मार्च 2024 रोजी गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.   शिरुर पोलिसांनी या घटनेच्या तपासाची चक्रे वेगात […]

अधिक वाचा..

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या (Shirur Shikshan Prasarak Mandal) कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापकपद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ करत आर्थिक लाभापासून वंचित ठेवुन, दबाव व दमदाटी करुन कोऱ्या दस्तऐवजावर सह्या घेऊन सर्वासमक्ष जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह संस्था सचिव प्रकाश बोरा, शाळा […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये वेश्याव्यवसायासाठी लॉज भाड्याने देणाऱ्या लॉज मालकांवर कारवाई कधी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शिरुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ येथील वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी 12 मार्च 2024 रोजी कारवाई केली होती. तसेच याबाबत पोलिस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन जणांवर गुन्हाही दाखल करण्यात […]

अधिक वाचा..
shirur-crime

शिरूर शहराजवळ युवकाची गळा चिरून हत्या…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरा जवळील उपनगरात बाबुराव नगर या ठिकाणी परराज्यातील युवकाचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी नगर पुणे रोड या ठिकाणी भैरवनाथ कृपा सहकारी गृह रचना मर्यादित शिरूर बाबुराव नगर या ठिकाणी वास्तव्यात असलेले काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मेहताब शाहिद मंसूरी या युववकाचा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..
crime

शिरुरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई; तीन जणांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शिरुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ येथील वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी कारवाई केली असुन याबाबत पोलिस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दिपक शंकरलाल उपाध्याय (रा. सुशीला पार्क,शिरुर) विमल बागवान टेलोत (वय 42) (रा. पिंडवाल ता. आसपुर […]

अधिक वाचा..