शिक्रापुर येथील ज्ञानमुद्रा स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

शिक्रापुर (अर्जुन शेळके) ‘गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दिपस्तंभ’ या पवित्र ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुच्या चरणी कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करत शिक्रापुर येथील ज्ञानमुद्रा स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात गुरुंच्या वंदनगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानमुद्रा स्कूलच्या सर्वेसर्वा उज्ज्वला राजगुरु होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी ठुबे-कापसे उपस्थित होत्या. या […]

अधिक वाचा..

पिंपरखेड-पंचतळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी एकास जबर मारहाण करुन लुटले

शिरुर (अरुणकुमार मोटे) गावात लग्न समारंभाच्या नियोजन आटोपुन घरी परतणाऱ्या एका नागरिकास पिंपरखेड – पंचतळे रस्त्यावरील रंगनाथ बाबा मंदिराजवळ अज्ञात इसमांनी जबर मारहाण करुन लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि १५) रोजी रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास घडली. हनुमंत सावकार वरे (वय ४१, रा. पिंपरखेड) असे या लुटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वरे […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेचा स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय उपक्रम

शिरूर (अरुणकुमार मोटे): स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर नगरपरिषद हद्दीतील शासकीय मुलींच्या वसतीगृह परिसरात वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बांबू, चिंच, कौठ, चिक्कू, जांभूळ यांसारख्या उपयोगी व पर्यावरणपूरक २३७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. […]

अधिक वाचा..
aamdabad-award

आमदाबाद येथे पार पडला गुणवंतांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नुकताच ‘आमदाबाद भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदाबाद गावचा ज्या ज्या व्यक्तींनी गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला सन्मान देण्याचा प्रयत्न आमदाबाद ग्रामपंचायत तसेच आमदाबादच्या सरपंच अनिता घुले तसेच आमदाबाद गावचे माजी आदर्श सरपंच पोपट घुले यांच्या विशेष प्रेरणेतून आणि प्रयत्नातून पार पडला. […]

अधिक वाचा..

शिरुर; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी ‘त्या’ फिर्यादी महिलेवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग करुन रेशनदुकान दाराने लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार करडे गावात घडला असुन याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने संबंधित रेशन दुकानदारा विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पोलिस स्टेशनला फिर्याद […]

अधिक वाचा..

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूरमध्ये तीव्र निषेध; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन सादर केले. या घटनेतील हल्लेखोर अद्याप मोकाट असून, त्यांच्या मुसक्या […]

अधिक वाचा..
kunal-kavitake

पारोडी येथील शेतकरी कुटुंबातील कुणाल कवितकेचे मोठे यश…

पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदाला गवसणी! रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथील कुणाल अण्णा कवितके याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. केवळ २५ व्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने महसूल सहाय्यक या प्रतिष्ठित पदाला गवसणी घातली आहे. कुणाल हा शेतकरी […]

अधिक वाचा..

शिरुर-चौफुला रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

न्हावरे (तेजस फडके) शिरुर-चौफुला रस्त्यावर आंधळगाव फाटा येथे दुचाकी आणि पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला असुन दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी पिकअप चालक दत्तात्रय रामचंद्र कदम (रा. रामलिंग, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे विकास रोहीदास मदने […]

अधिक वाचा..

शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आंबळे गावात ६ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलीस स्टेशनच्या पथकाने आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा प्रमुख संजय तुकाराम गायकवाड (रा. जालना) आणि त्याचा साथीदार सागर सुरेश शिंदे (रा. मंठा, जालना) यांना अटक केली आहे. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व […]

अधिक वाचा..
Shirur-Sarpanch-Sodat

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कुठे जल्लोष, कुठे निराशा!

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज (ता. ११) सरपंचपद आरक्षणाची सोडत मुख्य शिरूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. एकूण ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर झाले असून, अनेक गावांमध्ये खुल्या पदामुळे जल्लोष, तर काही गावांत आरक्षणामुळे हिरमोड झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत […]

अधिक वाचा..