मुख्य बातम्या

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

वढू बुद्रुक: वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटी विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज (शनिवार) पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच खासदार अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावरून काढता पाय घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटी विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज पार पडला. याच विकास आराखड्याच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पाडले. मात्र, या कार्यक्रमामध्ये नाराजीनाट्याचा अंक रंगला. खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच व्यासपीठावरून काढता पाय घेतला. कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अमोल कोल्हे म्हणाले, ‘मुळात या कार्यक्रमासाठी मला काल रात्री निमंत्रण मिळाले. कार्यक्रमामधील फ्लेक्सवर संभाजीराजे यांना स्थान देण्यात आलेले नाही. फक्त राजकीय पक्षांचे झेंडे दिसून येत आहेत. कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो दिसून आल्याने हा त्यांचा अपमान आहे.’

तत्पूर्वी, अजित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना मोठी चूक केली. अजित पवार यांनी संभाजीराजेंनी एकही निवडणूक हरलेली नाही, असा उल्लेख केला. चूक लक्षात येताच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दुरुस्त करण्यास सांगितले. यानंतर अजित पवार यांनी हात जोडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुढे देखील आमच्याकडून काही चुका झाल्या तर आमच्या लक्षात आणून द्या, असे म्हणाले.

अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे चांगले स्मारक व्हावे अशी सर्वांची इच्छा होती त्यानुसार हे स्मारक होईल. 397 कोटींचा विकास आरखडा मंजूर केला असून सर्व सोयीनियुक्त स्मारक उभं केलं जाईल. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख करत भाषणाला सुरूवात केली. हे गौरव स्मारक होण्यासाठी आम्हाला नवीन सरकार स्थापन करावं लागल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. समाधी स्थळ आणि बलिदान स्थळ ही महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून बांधले जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी पायाभरणी केली, तर संभाजी महाराजांनी कळस चढवला आहे.’

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

8 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

12 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

12 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

12 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

13 तास ago