शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्याबाबत खातरजमा करुन पोलिस पथकाने तीन जणांना याप्रकरणी अटक करुन त्यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

 

याबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे पोलिस हवालदार रोहीदास दौलत पारखे यांनी फिर्याद दाखल केली असुन १) ओंकार कृष्णराज आदक (वय १९) रा. होमाचीवाडी, टाकळी भिमा, ता.शिरुर, जि.पुणे,२) चेतन सुनिल शिंदे (वय २१) रा.निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि.पुणे, ३) शरद देवीदास माने (वय २१) रा. पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

 

याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना माहिती मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.

 

त्याप्रमाणे शिकापुर पोलीस स्टेशच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे तसेच पोलीस अंमलदार सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर यांनी मिळालेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी येथे छापा टाकुन १) ओंकार कृष्णराज आदक (वय १९), २) चेतन सुनिल शिंदे (वय २१), ३) शरद देवीदास माने (वय २१) या तिघांना चेतन शिंदे याच्या घराच्या जवळ पकडले.

 

या तिघांकडे २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस असा १ लाख १ हजार किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन सदर हत्यार हे त्यांनी मध्यप्रदेश येथुन विकत आणले असल्याचे सांगितले आहे. वरील तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहेत.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुणे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, प्रतिक जगताप यांच्या पथकाने केली आहे.

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रितम पाटील

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक