मुख्य बातम्या

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने उलटूनही रस्त्याच्या कामामध्ये विशेष अशी प्रगती दिसत नाही. रस्त्याचे काम काय फक्त कागदोपत्री सुरू आहे काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

शिक्रापूर-मलठण रस्ता खोदल्यामुळे नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहेत. दोन महिन्यात कामात हवी तेवढी सुधारणा दिसत नाही. ठेकेदाराकडून नियोजनाचा अभाव, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष आणि कामातील कासव गतीमुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. दररोज नागरिक तक्रारींचा पाढा वाचत आहेत. www.shirurtaluka.comने बातम्यांची मालिका सुरू ठेवली आहे. बातम्यांची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्यानंतर सूत्रे हालली आहेत.

शिक्रापूर-मलठण रस्ता हा मोठा वर्दळीचा आहे. परंतु, संपूर्ण रस्ताच खोदून ठेवल्यामुळे वाहन चालकांबरोबच वाघाळे, गणेगाव, बुरुंजवाडी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार अर्जासोबत www.shirurtaluka.comच्या बातम्याही जोडल्या होत्या. शासनाने याबाबत दखल घेतली असली सुधारणा दिसत नाही. यामुळे संबंधित रस्त्याचे काम फक्त कागदोपत्रीच सुरू आहे का? अशी शंका अशोक सोनवणे यांनी उपस्थित केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये कामात सुधारणा दिसली नाही तर शिक्रापूर चौकात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा अशोक सोनवणे यांनी दिला आहे.

दरम्यान, शासकीय अभियंता यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘शिक्रापूर-मलठण रस्त्याचे कामे वेगाने सुरू केले आहे. पुढील काही दिवसांमध्ये मोठा बदल पाहायला मिळेल.’

शिक्रापूर-मलठण रस्त्याची अवस्था जशीच्या तशी; ठेकेदाराने धरले वेठीस!

शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!

शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

शिक्रापूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प; ग्रामस्थ आक्रमक, आंदोलन करण्याचा इशारा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

4 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

20 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

20 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago