शिक्रापुर (प्रतिनिधी) ‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरीकांचे प्रश्न सुटणार हा देखावा असून, वास्तविक गेले पाच वर्ष नागरकांची प्रशासनाकडून पिळवणूक होत आहे. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार आहे, असे चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे.
चंदन सोंडेकर हे विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. श्री. सोंडेकर म्हणाले, ‘आमदारांनी आघाडी सरकार असताना शिरुर-हवेलीत मर्जीतील अधिकारी बसवले आहेत. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा धंदा चालू आहे. अनेक अधिकारी आमदारांच्या समन्वय समिती बैठकीत गैरहजर असतात. शिरूर तालुक्यात एजंट आणि पैसे दिल्याशिवाय प्रशासनात नागरीकांची कामेच होत नाहीत. केवायसी ऑनलाईन साधे रेशन कार्ड मिळत नाहीत. आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती झाली आहे.’
‘विरोधी पक्षात स्व. आमदार बाबुराव पाचर्णे यांची कमतरता निश्चितच जाणवत आहे. नागरीकांच्या हजारो तक्रारी प्रशासनात प्रलंबित आहेत. भुमी अभिलेख म्हणजे ज्याचे पैसे त्याची मोजणी, चर्तुसिमा त्याचा ताबा असा धंदा चालू आहे. महावितरण म्हणजे फक्त आमदारांच्या कार्यकर्त्यांनाच डीपी ती सुद्धा फक्त सणसवाडीतच. शिरुर हवेलीत 100 पैकी 99 गावात अंधार आहे. शिरूर तालुक्यात अनेक समस्या आहेत. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार असून, जनतेससाठी 24 चोवीस तास उपलब्ध राहणार आहे, असे श्री. सोंडकर यांनी म्हटले आहे.
शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…