वजन कमी करण्यासाठी या चुका टाळा 

आरोग्य

भरपूर व्यायाम करून तसेच योग्य आहार घेऊन देखील बऱ्याच जणांचे वजन कमी होत नाही. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, तरी देखील म्हणावा तसा फायदा होत नाही. नक्कीच आपण काही चुका करत असातो, त्यामुळे वजन कमी होत नाही.

खालील चुका टाळा

कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे

बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो की, आपण बारीक होऊ किंवा सडपातळ होऊ शकतो, परंतु जर आपण जेवढ्या कॅलरीज बर्न करणार आहोत तेवढ्याच खाणार असाल तर वजन कमी होणे अशक्यच आहे.

दारूचे व्यसन

आपल्याला आरोग्यासाठी दारू किती धोकादायक आहे हे सांगण्याची गरज नाही. तसेच अल्कोहोल हळूहळू शरीराला कमकुवत व आळशी बनवते.

आळशीपणा

लठ्ठपणा कमी करण्याची लढाई तोपर्यंत जिंकता येत नाही जोपर्यंत आपण आळशी आहोत. व्यायामाबरोबर आपली दिवसभरात हालचाल असणे गरजेचे आहे.

सतत ट्रेस घेणे

तणावामुळे शरीरात विशिष्ट हार्मोन्स मध्ये वाढ होऊ शकते, यामुळे पचन व्यवस्थित न झाल्यास आपले वजन कमी होण्याची किंवा पोटावरील चरबी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. आपण तणावाचे नियंत्रण करण्यासाठी ध्यान करू शकतो.

डायट मध्ये प्रोटीन ची कमी 

वजन कमी करण्यासाठी आपण आहार खूप कमी करतो व त्या बरोबरच आपल्याला डायट मध्ये प्रोटीन ची कमी भासते, ज्यामधून आपल्याला अधिक ऊर्जा मिळते. आहार कमी केल्याने आपले चयापचय देखील कमी होते. जरी वजन कमी झाले तरी आपले स्नायू कमकुवत होतात, जे आरोग्यासाठी योग्य नाही.

पूर्ण झोप न घेणे

उशीरा पर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे शरीरासाठी धोकादायक आहे. कमी झोपेमुळे आळस व जंक फूड खाण्याचे देखील तीव्र इच्छा होईल, या दोन्ही गोष्टी शरीरासाठी हानीकारक आहे, त्यामुळे आपण सहा ते आठ तास तरी किमान झोप घेणे गरजेचे आहे.

वेट लिफ्टिंग सारखे व्यायाम प्रकार

वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांना वाटते कि, वजन उचलण्याचा व्यायाम फारसा फायदा देत नाही. परंतु वजन कमी करण्या सोबत स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी हे व्यायाम प्रकार मदत करतात, खास करून पोट आणि मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी आपण वेटलिफ्टिंग चे व्यायाम प्रकार करू शकतो. आपली दिनचर्या, आहार, व्यायाम, झोप, ताण तणाव, चुकीच्या सवयी व मनःशांती अश्या सर्व गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचं आहे.

(सोशल मीडियावरून साभार)