मंत्री शंभूराज देसाई आईला मिठी मारून अश्रू अनावर

महाराष्ट्र

सातारा: मंत्री शंभूराज देसाई यांनी तब्बल ५५ वर्षांनंतर आपल्या ‘मेघदूत’ बंगल्यात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. ‘मेघदूत’ बंगला हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणाशी निगडित असून, त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बंगला मिळवला होता. या ठिकाणीच मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी आयुष्याची पहिली पाच वर्षे येथेच व्यतीत केली होती.

शंभूराज देसाईंचा भावनिक गृहप्रवेश

पंचावन्न वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंत्री देसाई आपल्या मातोश्रींसह पुन्हा या बंगल्यात परतले. या क्षणी त्यांनी अनुभवलेल्या आठवणींनी त्यांचे आणि संपूर्ण देसाई कुटुंबाचे डोळे पाणावले.

संपूर्ण देसाई कुटुंब भावूक

हा गृहप्रवेश फक्त नवीन घरात पाऊल ठेवण्याचा क्षण नव्हता, तर त्यांच्या बालपणाच्या आठवणी, कौटुंबिक वारसा आणि भावनिक बंध यांचा साक्षीदार ठरला. संपूर्ण देसाई कुटुंब या क्षणी भावूक झाले होते, कारण हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला.