त्या पतसंस्थेच्या २७ कोटीच्या अपहार प्रकरणातील आरोपींना अटक करावी, ठेवीदारांचे पोलिसांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत 27 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार करणारे संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल होऊन वर्ष उलटले तरी अटक झाली नसून या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी ठेवीदार महिला व पुरुषांनी आज शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना राखी बांधून आगळे […]

अधिक वाचा..

प्रेमप्रकरणातून दिवसाढवळ्या आरोपीने तरुणावर चाकूने केले सपासप वार

बुलढाणा: बुलढाणा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे 1 ऑगस्ट रोजी घडली आहे. मृत्यू झालेल्या निष्पाप तरुणाचे सीन सुरेश जाधव (वय 19) असे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा..

निर्दोष नव्हे तर पुराव्यांच्या अभावी सोडण्यात आलेले आरोपी, मालेगाव निकालानंतर कॉंग्रेसचा घणाघात

मुंबई: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल लागला आहे. यानंतर एकीकडे महायुतीने कॉंग्रेसवर टीका केली असताना आता कॉंग्रेसनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एनआयएवर निशाणा साधला आहे. तसेच, […]

अधिक वाचा..

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचे आरोप; निखील खडसेंनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा नक्की काय घडल

पुणे: राज्याच्या राजकारणातील बडे नेते, माजी मंत्री असलेले एकनाथ खडसे यांच्यावरती सातत्याने त्यांच्या मुलाच्या म्हणजेच निखिल खडसेंच्या हत्येचे आरोप होत असतात. पण वडिलांवरच मुलाला संपवल्याचे का आरोप का होतात. निखील खडसेंसोबत त्या दिवशी काय घडलं होतं? याबाबतचे खुलासे राष्ट्रवादी काँग्रेस शरददचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी केले आहेत. निखिल दादा बेडवरती पडला होता, रक्त वाहत […]

अधिक वाचा..

नकुशा तांबे आत्महत्या प्रकरण; आरोपी निर्दोष मुक्त, वकिलांच्या संयमशील युक्तिवादाचे कौतुक

शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरूर) येथील नकुशा अनिल तांबे (वय २५) हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचे पती अनिल चिंधू तांबे, सासरा चिंधू सिदू तांबे आणि सासू मुक्ताबाई चिंधू तांबे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याचा निकाल सोमवारी (२१ जुलै २०२५) पुण्यातील एस. जी. जोशी यांच्या न्यायालयात जाहीर करण्यात आला. नकुशाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर २० नोव्हेंबर […]

अधिक वाचा..

त्या अल्पवयीन पीडितांच्या घरासमोर दहशत पसरवणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा

मुंबई: उल्हासनगर (रमाबाई टेकडी) येथे अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींपैकी रोहित झा हा जामिनावर सुटून आल्यावर पीडित मुलींच्या घरासमोर ढोल-ताशे, फटाके वाजवत मिरवणूक काढत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना कठोर कारवाई करत आरोपीचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. आरोपीने […]

अधिक वाचा..

घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला; एका आरोपीचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध, तपासाला वेग

शिरूर (अरुणकुमार मोटे) मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे बुधवारी (ता. १६ जुलै) रात्रीच्या सुमारास घरात घुसून १९ वर्षीय तरुणावर झालेल्या गंभीर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोपींपैकी एका हल्लेखोराचे स्केच प्रसिद्ध केले आहे. या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 24 तासांच्या आत अटक

लोणावळा: दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02:00 वाजेच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे ह‌द्दीतील ठाकुरसाई गावात एका 33 वर्षीय महिलेस रस्त्यात आडवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एक अनोळखी इसमास केवळ 24 तासांत अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गु.र.नं. 190/2025 नोंदवण्यात आला होता. सदर गुन्हयाचे […]

अधिक वाचा..

वैष्णवीच्या मामे सासऱ्यांवर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; पोलिस महानिरीक्षक सुपेकरांचा दबाव

अंजली दमानियांचा हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप पुणे: आयजी जालिंदर सुपेकरांवर 500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशीपुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे यांचा त्यांच्या सासरी हुंड्यासाठी छळ झाला होता.या प्रकरणी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार असल्याचे समजते. त्यांना […]

अधिक वाचा..

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केली. वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ही घटना अत्यंत वेदनादायक आणि अमानुष असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात […]

अधिक वाचा..