ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन ब्रह्मपुरी: केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, नरेंद्र […]

अधिक वाचा..

मुंबई मेट्रोत युवक काँग्रेसची NEET पेपरफुटीविरोधात जनजागृती मोहीम; भाजप सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी […]

अधिक वाचा..

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ […]

अधिक वाचा..

भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ; संध्याताई सव्वालाखे

महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार मुंबई: भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी बचाव हा पोकळ नारा असून भाजपा महायुती सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार आहे, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे. भारताच्या […]

अधिक वाचा..