शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात शुक्रवारी (ता. ३०) मोठा राजकीय भूकंप झाला. उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल २० नगरसेवकांच्या समर्थनाने मंजूर झाला. नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. […]

अधिक वाचा..