मराठी मनोरंजन सृष्टीच्या विकासासाठी शासनाचे ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच सुरु होणार

मुंबई: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारच्या संवेदना बोथट; अजित पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षांनी केला सभात्याग… मुंबई: अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असा आरोप करत शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

संभाजीनगर व धाराशिव नामांतराबाबत सरकारची भूमिका संशयास्पद…

लातूर: औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारने काढलेल्या परीपत्रकात तफावत आहे. यावरून संभाजीनगर व धाराशिव नामांतराबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद वाटते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज लातूर येथे शिवगर्जना अभियान कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला,त्यावेळी ते बोलत होते. केंद्राने नामांतराच्या परिपत्रकात दुरुस्ती […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा […]

अधिक वाचा..

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून शिंदे सरकारची ही […]

अधिक वाचा..

भिडेवाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडा

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती शिक्रापूर (शेरखान शेख): पुण्यातील भिडेवाड्याला महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व असून या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राज्याच्या महाधिवक्त्यांना केली आहे. पुणे येथील भिडे वाड्याचा राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे!

नागपूर: युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला आहे. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका मुलासाठीही शाळा, शिक्षण, मध्यान्ह […]

अधिक वाचा..

आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू

मुंबई: महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व या कायद्याला समस्त महिलावर्गाने विरोध करावा असा आग्रह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

सरकारच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब का?

नाशिक: राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी सोमवार (दि.5) सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील ता. वांजरवाडी व सिन्नर येथील मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. एकप्रकारे […]

अधिक वाचा..