ज्येष्ठ समाजसेवक, निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर…

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी […]

अधिक वाचा..

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक

मुंबई: “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करु”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. आज या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका परिषदेत केसरकर बोलत होते. यावेळी जर्मनीच्या बाडेन वृटेमबर्गचे राज्यमंत्री डॉ. […]

अधिक वाचा..

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत रंगला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान… मुंबई: सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो. आज गौरविण्यात आलेल्या कलाकारांनी वर्षानुवर्ष सेवाभावी वृत्तीने काम करुन कलेची उपासना केली. या अशा कलाकारांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी […]

अधिक वाचा..

कर रुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली…

मुंबई: लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. सन २०१८ ते २०२२ […]

अधिक वाचा..

शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही…

मुंबई: या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान…

नवी दिल्ली: महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात […]

अधिक वाचा..

भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या युवांची निवड

मुंबई: भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के ही युवा पिढी भारताच्या लोकसंख्या मध्ये सामील होते. देशातील युवक हा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याचा बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या प्रश्नाने ही ग्रासले आहे. भारताचा युवांच्या आत्महत्येमध्ये जगात ४३वा नंबर लागतो. तरुणांच्या एक लाख लोकसंख्येमागे युवक […]

अधिक वाचा..

राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ

येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विधान भवन येथे येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन धुमाळ

उपाध्यक्षपदी अविनाश घोलप तर सचिवपदी मंगेश रत्नाकर शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची बैठक नुकतीच सा संपन्न झाली, यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक संदीप खळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. […]

अधिक वाचा..