महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, संघटक निलेश जगताप, कार्यकारी समितीच्या अध्यक्षा किरण पिंगळे, राधिका शेटे आदी उपस्थित होते.

यावेळी शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, राजेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या पत्रकार बांधवांनी एक आकर्षक दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. ज्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांचे संपर्क क्रमांक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्यांच्यापर्यंत आपले गा-हाणे पोहोचविणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या पत्रकार बांधवांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेला आणि सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा.

आ. दिलीपराव वळसे पाटील (माजी गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने यापुढे शिरुर तालुक्यात नावीन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येणार असुन सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही सर्वजण वेळोवेळी कटीबद्ध राहणार आहोत. पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळी आरोग्य शिबीरे घेण्याचा मानस आहे.

अरुणकुमार मोटे (विभागीय सदस्य)

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ