नाशिक मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली गंभीर दखल

दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांना दिले निर्देश ठाणे: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे चार पत्रकारांना मारहाण झाल्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पत्रकारांना अमानुष मारहाण […]

अधिक वाचा..

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिराव

मुंबई: नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना ही नेहमी सक्रिय आहे. मनसेसुद्धा […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे ते दोघे दीड महिन्यानंतर नाशिक येथे जेरबंद

पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा गेवराई: अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवणा-या त्या दोघांना अखेर बुधवारी नाशिकमध्ये गेवराईच्या तलवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोघे पोलिसांना देत होते गुंगारा दीड महिन्यानंतर पोलीसांची कारवाई गोवर्धन यलदाळे, रा. रोहीतळ, ता. गेवराई व सतीश (मल्या) माळोदे रा. नाळवंडी, ता. बीड या दोघांनी एका अल्पवयीन मुलीस […]

अधिक वाचा..

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..

नाशिकच्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणातला ‘तो’ हॉटेलचालक कोण?

नाशिक: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणावर सभागृहाला माहिती दिली. शिवाय कुठल्याही आजी-माजी मंत्र्याची तशी तक्रार नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी सभागृहात पेन डाईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील […]

अधिक वाचा..

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी मुंबई: पुणे – नाशिक आणि नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला जोर का धक्का…

संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ ठाणे: नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेश झालेल्यामध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक […]

अधिक वाचा..

नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर व नाशिकमध्ये या शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम केले. नाशिकमधील हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..
manohar-raut-nashik

माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड येथील माजी सरपंचाची साडूनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, मेहुणीसह बायकोवरही कुऱ्हाडीने वार केल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरगाणा शहरापासून जवळच असलेल्या सूर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना बुधवारी (ता. 16) पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान […]

अधिक वाचा..