रमजाननिमित्त टिळक भवनमध्ये काँग्रेसची सर्वधर्मीय इफ्तार पार्टी

मुंबई: पवित्र Ramadan महिन्यानिमित्त Maharashtra Pradesh Congress Committee तर्फे आज दादर येथील Tilak Bhavan येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध धर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal प्रमुख उपस्थित होते. यावेळी Indian National Congress चे सचिव Sachin Sawant, प्रदेश काँग्रेसच्या […]

अधिक वाचा..

महिला दिनानिमित्त ‘महिला कला महोत्सव २०२६’ ची उत्साहात सांगता

मुंबई: महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला कला महोत्सव २०२६’ या महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. रवींद्र नाट्य मंदिर येथे ५ ते ८ मार्चदरम्यान पार पडलेल्या या महोत्सवातील विविध नाट्य आणि संगीत कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. महोत्सवात विविध […]

अधिक वाचा..

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात उत्साह;

‘जावे विनोदाच्या गावा’ रंगला, ‘लोकसेवेचा लोकजागर’ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन आज विधान भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदी साहित्याचे अभिवाचन, संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.याचवेळी वि. स. पागे […]

अधिक वाचा..

होळीनिमित्त मनरेगा मजुरांसाठी तातडीने 67 कोटींचा निधी मंजूर; रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

मुंबई: होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांत मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली. […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच घेतली आहे. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी रितेश देशमुख यांचा लूक […]

अधिक वाचा..

वाढदिवस माणुसकीचा! एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जे.जे. रुग्णालयात नवमाता व बालकांना वस्त्रदान

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय सोहळा नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा उत्सव असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात नवमाता व नवजात बालकांसाठी वस्त्रदानाचा हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला. […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचे राज्यभरात लोकोपयोगी उपक्रम

‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता, मराठी भाषा संवर्धनाची मोहीम मुंबई: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेकडून ‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता मोहीम, ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ यासह अनेक लोकोपयोगी उपक्रमांची घोषणा शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजना; २३ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी

मुंबई: सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी एक महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साकारली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ या विशेष योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे […]

अधिक वाचा..

शिरुर! राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): “राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या विचारांमधूनच स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे शिवरायांच्या मनात रोवली गेली. तसेच स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोन्ही महामानवांचे कार्य प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करावेत,” असे […]

अधिक वाचा..