शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे

नागपूर: नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात आहे.. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी शेतकऱ्यांचा नाकारला […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला अधिकचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार

मुंबई: राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अधिक व चांगला बाजार भाव मिळावा यासाठी लवकरच राष्ट्रीय बाजार धोरण आणणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य कृष्णा खोपडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूरमधील कामकाज प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे 

मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन नागपूर: कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, धानाला बोनस मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. “कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, […]

अधिक वाचा..

मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून ऑलिंपिक विजेते घडावेत; अजित पवार

पुणे: महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांनी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा यंदा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमधून भावी ऑलिंपिक पदक विजेते घडावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघटनेच्या बैठकीत व्यक्त केली. महाराष्ट्रात यंदा राज्यस्तरावर विविध खेळांची मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धा संदर्भात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..