कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकभवन, मुंबई येथे आयोजित या सोहळ्यात कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी वारशामुळे महाराष्ट्र देशसेवेत नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. कारगिल युद्धातही राज्यातील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य, त्याग आणि बलिदान देत राष्ट्राचा अभिमान वाढवला.

या कार्यक्रमाला जिष्णु देव वर्मा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, व्हाइस अॅडमिरल संजय वात्सम, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर तसेच वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि भारतीय सैन्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत