शिरुर तालुक्यात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत कारेश्वर भिशीच्या नावाखाली ३९ जणांना २० कोटींचा गंडा

शिरुर (तेजस फडके): कारेश्वर बी.सी. मंडळाच्या नावाखाली भिशी चालवून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ३९ गुंतवणूकदारांकडून २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कारेगाव (शिरुर) येथे समोर आला आहे. भिशी बंद पडल्याचे सांगून गुंतवणूकदारांनी वारंवार मागणी करुनही रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच […]

अधिक वाचा..

आमदार सचिन कल्याणशेट्टींना गोळ्या घालण्याची ऑफर? चालकाला दाखवले पैशांचे आमिष

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदारांना गोळ्या झाडून ठार करण्यासाठी चालकाला थेट ऑफर देण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापूर शहरातील […]

अधिक वाचा..

कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. बाळासाहेबांनीही अठरा पगड जातींना एकत्र केलं, तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी पदं देऊन बळ दिलं. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचाराने शिवसेना पुढे जातेय. शिवसेना वाढवण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं, हे शिवसेनेचं वचन आहे, असे प्रतिपादन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार; नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

रत्नागिरी: शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून २०२१ ते २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच.पण कर्जमाफी हा तात्कालीक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या […]

अधिक वाचा..

मोदी व फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले, नरेंद्र मोदी योगी नाही तर सत्ताभोगी

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित मुंबई: नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या […]

अधिक वाचा..

भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल:- सुधीर मुनगंटीवार

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे प्रतिपादन ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. भाजपाच्या वचननामा समितीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर ते बोलत होते. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पीर पडलेल्या या बैठकीला वचननामा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री मंगलप्रभात लोढा, श्री दिलीप कांबळे, श्री […]

अधिक वाचा..