मलठणच्या शिंदेवाडीतील आठ कुटुंबांची बांधकाम व्यावसायिकांकडून लाखोंची फसवणूक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठणच्या शिंदेवाडी, वरुडे आणि निमगाव दुडे येथील आठ कुटुंबांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावातील चार कॉन्ट्रॅक्टर्सकडून तब्बल ५५.९१ लाखांची फसवणूक झाल्याची गंभीर तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, वैजनाथ मोहिते, अजय पवार, नामदेव पवार आणि मोहन चव्हाण या चौघांनी गावात आठ ते नऊ महिने वास्तव्य करून घरबांधणीची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिक नागरीकांमध्ये पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन अचानक भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. बैलगाडा घाटात झालेल्या मारहाणीत संजय रखमा शिंदे […]

अधिक वाचा..

शिंदेवाडी येथे बैलगाडा प्रेमींची निराशा…भांडण झाल्याने शर्यती अर्ध्यातच बंद; एकजण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडी येथे आज रविवार (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती सुरु असताना बैलगाडा घाटातच स्थानिक नागरिकांमध्ये अचानक वादावादी झाल्याने शर्यती बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले.   शिंदेवाडी येथील स्थानिक दोन कुटुंबात ही वादावादी झाली असुन […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच

मलठणच्या शिंदेवाडीतून शेळ्यांची चोरी शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट झाला असुन या चोऱ्या रोखण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या मलठण (ता.शिरूर) येथील शिंदेवाडी येथून शुक्रवारी (दि.१९) रोजी रात्री बापू शिंदे यांच्या तीन शेळ्या चोरीस गेल्या आहेत. शिरुर पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढविणे गरजेचे असुन प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल […]

अधिक वाचा..