vishal-kale-shirur

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे याचा मृत्यू झाला आहे. केदार चंद्रकांत झाडगे आणि उमेश अनिल जगदाळे हे दोन युवक जखमी झाले आहेत. झाडगे याच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार चालू आहेत. जगदाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सनी संजय यादव आणि विशाल पन्दी यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरूद्ध […]

अधिक वाचा..
datta-gade-police-dress

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरूर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याला तत्परतेने अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणात दत्तात्रय गाडे याच्या विरोधात अवघ्या 52 दिवसात 892 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या संवेदनशील […]

अधिक वाचा..
Crime

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अक्षरशः गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या थरारक गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली […]

अधिक वाचा..
nimgaon-bhogi-liquor

शिरूर तालुक्यात हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा…

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) : शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील शेवाळे वस्ती परिसरात सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारु निर्मितीच्या अड्ड्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon MIDC Police) धडक कारवाई करत मोठा साठा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. निमगाव भोगी, […]

अधिक वाचा..
shirur-kurshi-utpanna-bajar samiti

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक; पाहा मतदान आणि मतमोजणी कधी…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून, शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, शिरूर) हरिश्चंद्र कांबळे यांनी बाजार समितीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम (नमुना क्र. ६) जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ५ जुलै २०२६ रोजी मतदान होणार […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात चोरी करताना तीन चोरट्यांना पकडले रंगेहात अन्…

शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदकवस्ती परिसरातील एका डाळिंबाच्या बागेत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या तीन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडील दुचाकी आणि चोरीसाठी आणलेली पोती (गोणपाट) जप्त केली आहेत. याप्रकरणी शेतकरी रोहीदास पोपट हिल्लाळ (वय ४१, रा. सोदकवस्ती, टाकळी हाजी, ता. […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे ते शिरूर हा प्रवास होणार केवळ ४५ मिनिटांत; पण कधी पाहा…

पुणे : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उन्नत महामार्गाच्या उभारणीस गती मिळाली असून, हा देशातील सर्वांत लांब उन्नत महामार्ग ठरणार आहे. या महामार्गाची लांबी ३५.१२ किलोमीटर असेल. याचबरोबर पुणे-शिरूर महामार्गाचे रुंदीकरण करून तो सहापदरी केला जाणार आहे. यामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास केवळ ४५ मिनिटांत होणार आहे. पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाच्या कामास राज्य […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

पाबळ (सुनिल जिते) :  शेतात घुसलेली जनावरे बाजूला घेऊन बांधण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्धाचा एक दात पडला असून तीन दात निकामी झाले आहेत. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकी चोरीचे वाढले प्रमाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहर व तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अवघ्या महिनाभरात चार दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी दोन घटना शिरूर शहरातील ढोरआळी परिसरात तर एक घटना कवठे येमाई येथे घडली आहे. सतत घडणाऱ्या या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे […]

अधिक वाचा..
Crime

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारात सुमारे ९९ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र लंपास करण्यात आले असून, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीमती ज्योती भाउसाहेब सरड (वय ३८ वर्ष , व्यवसाय […]

अधिक वाचा..