निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

शिरुर (अरुणकुमार मोटे): निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे सचिन बाबाजी गोरडे यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तीला ठार केल्याची घटना बुधवार (दि. १२) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. सचिन बाबाजी गोरडे यांच्या घराजवळ रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंगणात बांधलेल्या कालवडीवर अचानक हल्ला करून ठार केले. इतर जनावरे ओरडल्याचा आवाज आल्यावर गोरडे कुटुंबीय जागे […]

अधिक वाचा..

आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्पूर्वीचे उपसरपंच कांताराम नऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतून एकमेव प्रदिप साळवे यांचे नामनिर्देशन अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच लीला पवार यांनी काम […]

अधिक वाचा..

भुमी आभिलेख कार्यालयातील मोजणीची शेकडो प्रकरणे गायब

चूकार कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदया अंतर्गत कारवाई करा; ऍड. सागर दरेकर शिरुर (अरुणकुमार मोटे): भुमि अभिलेख शिरूर कार्यालयाकडून गेल्या सात महीन्यापासून मोजणी होऊनही शेतकऱ्यांना क प्रत नकाशा उपलब्ध करून देण्यास अदयापही टाळाटाळ केली जात आहे. वरीष्ठ कार्यालयाकडे याबाबतची तक्रार करुन देखील दोषींवर अद्याप कारवाई होत नसल्याचे तक्रारदार ऍड. सागर दरेकर यांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे […]

अधिक वाचा..

झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती गठित

मुंबई: रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे […]

अधिक वाचा..

महिलांसाठी सार्वजनिक सुविधा केंद्र सुरू करणार; पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई: राज्यात नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शासन काम करीत आहे. याच उद्देशाने मुंबई शहरात देखील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘एफ दक्षिण’ विभागातील महिलांसाठी सुविधा केंद्र उभारून तेथे त्यांना आठवड्यातून […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम

मुंबई: पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्तराष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत […]

अधिक वाचा..

वसतिगृहातील मुलींचे सर्वांनी पालक म्हणून समाजिक जबाबदारी स्वीकारावी; चंद्रकांत पाटील

मुंबई: वसतिगृहातील मुलींची प्रत्येकांनी पालक म्हणून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे,असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय,चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..

भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडू देणार नाही; अस्लम शेख

मुंबई: शेकडो वर्ष जूनी असलेलेली भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी काहीही झाले तरी तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतल्याने बुधवारी चेतना कॉलेज, वांद्रे येथे पार पडलेली मुंबई उपनगर जिल्हा नियोजनची बैठक वादळी ठरली आहे. मालाड-पश्चिम येथील भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याने […]

अधिक वाचा..

सप्तश्रृंगी अपघातातील जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना; अजित पवार

मुंबई: नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार मोफत आणि तातडीने करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. काल सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री […]

अधिक वाचा..