शिरुर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा दाखल 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सुनेचा वेळोवेळी छळ करत माहेरहुन भांडी, पैसे, दागीने तसेच साडयाची मागणी करून त्या वस्तु न मिळाल्याने सुनेला मारहाण करत शिवीगाळ करुन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पतीसह सासु आणि सासऱ्यांविरुद्ध सुरेखा शहाजी बांदल यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील बोरी गावच्या काव्या हिचा विवाह शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील किशोर संजय निंबाळकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासु लता संजय निंबाळकर, २) सासरे संजय विनायक निंबाळकर व ३) पती किशोर संजय निंबाळकर यांनी काव्याचा वेळोवेळी छळ करत माहेरहुन भांडी, पैसे, दागीने तसेच साडयाची मागणी करून त्या वस्तु न मिळाल्याने सुनेला मारहाण करत शिवीगाळ करत होते.

तसेच सासु लता संजय निंबाळकर हीने काव्या ही गरोदर असताना तीला डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याबाबत सांगीतले असताना सासु लता यांनी काव्यास जड उचलण्यास सांगितल्याने तीचा गर्भपात होण्यास सासु लता निंबाळकर ह्या कारणीभूत आहेत. तसेच पती किशोर हा तिला वारंवार मारहाण व शिवीगाळ करत होता. त्यामुळे या सर्वांच्या जाचाला कंटाळून काव्याने (18 जुलै) रोजी दुपारी 2.44 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळेमुलगी काव्या हिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने काव्याची आई सुरेखा शहाजी बांदल (वय 42) रा. बोरी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत.