सोयाबीन पावणेसहा, तूर आठ हजारांवर; बाजारपेठेत भाववाढ, आवक मात्र मंद

मुंबई: बाजारपेठेत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असली तरी आवक मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असून, मागील १५ ते २० दिवसांपासून दररोज नियमितपणे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीन डीओसी (ढेपी)लाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. ढेपीच्या दरात वाढ झाल्यामुळे […]

अधिक वाचा..

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदत वाढ नाही

मुंबई: महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ (दि ६) फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती. काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणा मध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे मा. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी

मुंबई: महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वांत जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. दि. 06 फेब्रुवारी 2025 अखेर 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 मे.टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. खरेदी केलेला सोयाबीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या […]

अधिक वाचा..

भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही…

मुंबई: नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची […]

अधिक वाचा..

सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे जाणून घ्या…

रक्ताभिसरण सुधारते… सोयाबीन खाण्याचे फायदे असे आहेत की, सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. तज्ञ्जांच्या मते लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे. गरोदरपणात उपयुक्त… […]

अधिक वाचा..