शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुंबईचे माजी शेरीफ जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते विजय सावंत, राहुल जगताप यांच्यासह अनेक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनतर्फे देण्यात येणारा ‘लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर विजय सावंत […]

अधिक वाचा..

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील शिक्षकांचा पेन आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीने हा उपक्रम राबविला. शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार देऊन त्यांना जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिक पुरस्कार २०२५ वितरण

शिरूर (किरण शेलार पिंगळे): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पूरस्कार २०२५ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातील योगदान तसेच समाजकार्यातील सहभाग अधोरेखित करत गेली नऊ वर्षे हे पुरस्कार दिले जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. […]

अधिक वाचा..
ramdas thite

बदलते शैक्षणिक धोरण आणि शिक्षक…

सामाजिक बांधिलकीचे भान जपत जीवन कृतार्थ करणारी विद्या तप, तेज, संयम आणि सातत्याने साकारणे ही काळाची गरज आहे. ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.. शिक्षण विचारांची ज्ञानसंपदा आणि जीवनश्रध्देचा मूर्तिमंत अविष्कार आहे. शिक्षक ते राष्ट्रपती असा प्रवास साकारताना अज्ञान, अविवेक, अविचार, आग्रह यापासून दूर जात शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचा पाया आहे हे त्यांनी आपल्या […]

अधिक वाचा..
shingadwadi-school

शिंगाडवाडी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा…

शिक्रापूरः अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या ज्ञानरूपी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व भारताचे मा राष्ट्रपती शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाडवाडी (ता. शिरूर) येथे आगळा वेगळा शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शालेय विध्यार्थ्यानी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या […]

अधिक वाचा..

लांडेवस्ती शाळेत शिक्षकदिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आलेली असताना सदर कार्यक्रमात परिसरातील मुख्याध्यापक शिक्षकांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील मुख्याध्यापकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे, लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका […]

अधिक वाचा..