‘मागासवर्गीय’ शब्द वगळला! ४१६ शासकीय वसतिगृहांचे नामांतर; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या नावांतून ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश वसतिगृहांना ‘मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृह’ […]

अधिक वाचा..

शब्द पाळणारा नेता राजेंद्र जगदाळे (RB) अनोसेवाडीच्या वाडी-वस्त्यांवर उजळला प्रकाश…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील अनोसेवाडी येथील वाडी-वस्त्यांवर अनेक वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीच्या वेळी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र दिलेला शब्द पाळत करडे गावचे सुपुत्र आर बी पाटील (राजेंद्र) जगदाळे यांनी या समस्येवर ठोस उपाय करत वाडी-वस्त्यांवर पथदिवे बसवून प्रकाशाचा मार्ग खुला केला. […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ‘तो’ एक शब्द वापरला अन्

मुंबई: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी 25 मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. बाळासाहेबांच्या खोलीत जात त्यांच्या आसनाला अभिवादन केले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी वापरलेल्या एका शब्दामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते धास्तावले […]

अधिक वाचा..

नावासमोर डॉक्टर लागल, आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली

उदय सामंत झाले भावूक  पुणे: डॉ. उदय सामंत… राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना आज अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानाने भावूक होत उदय सामंत यांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांना डॉक्टरेट […]

अधिक वाचा..