रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती रोडवरील आयटीसी कंपनीच्या चमडिया गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किटे व साबण असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरण्याची धाडसी घटना घडली होती. या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत चोरीचा छडा लावत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.   View […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, १८ गुन्ह्यांतील मुद्देमाल शोधून १२ लाख ३६ हजारांचा माल फिर्यादींच्या ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात 19 हजार 200 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट 60 हजार संधी होणार उपलब्ध ठाणे: “मेडिसिटी” हा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प असून या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूरला देशातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र बनविणे, तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून, केवळ विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत, हा आहे. […]

अधिक वाचा..

शिरसगाव काटा येथे जबरी चोरी, 1 लाख ४० हजाराचा मुद्देमाल लंपास 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा गावात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून जबरी मारहाण करत तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजल्यापासून ११ ऑगस्ट रोजी १२.३० वाजले च्या सुमारास घडले असुन फिर्यादी अमोल अशोक कुंजीर […]

अधिक वाचा..

उभ्या असलेल्या टेम्पोतून 53 हजाराचा पॉपकॉर्नचा साठा चोरीला, अज्ञात चोरांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुरावनगर भागात उभ्या असलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्याने तब्बल 53 हजार 532 रुपयांचा पॉपकॉर्नचा साठा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी दत्तात्रय भाउसाहेब देवकर (वय ३१) व्यवसाय – चालक, रा. चांडोली गाव, ता. खेड, जि. पुणे यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, ही चोरी ६ ऑगस्ट रोजी […]

अधिक वाचा..

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीसह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १५ जुलै ते २१ जुलै या कालावधीत घडली असून, या प्रकरणी खोपोली येथे वास्तव्यास असलेले एकनाथ जालिंदर इचके (वय ५६) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बी बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडले; रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव लेण्याद्री अष्टविनायक महामार्गालगत असलेले बी. बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता.23) पहाटे दोन ते साडेतीनच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर शेजारील कपड्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत […]

अधिक वाचा..

सह्याद्री हॉस्पिटलची जागा ना विकता येणार ना भाड्याने देता येणार, 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत

पुणे: पुण्यातील मोठी रुग्णालय साखळी असलेलं सह्याद्री हॉस्पिटल्सची विक्री हा सध्या राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय आहे. भारतातील आघाडीची रुग्णालय साखळी असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्सने ही खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार 6,400 कोटी रुपयांना झाल्याची माहिती आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या व्यवहारांपैकी एक असलेला हा व्यवहार आता अडचणीत सापडलाय. पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचा डाळिंब माल चोरीला; तालुक्यातील तिसरी घटना

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावातुन एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ४५०० किलो वजनाचा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा डाळिंबाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिंदोडी येथील शेतकरी शहाजी तुकाराम वाळुंज (वय ५०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०२ जुलै २०२५ […]

अधिक वाचा..