रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) आज (दि २४) संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती.
यावेळी भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच पावसाचे दिवस चालू असल्यामुळे भाविकांसाठी मंडपाची सोय केलेली होती इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.
संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त डॉ ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव तसेच राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान राबवणार; बाळासाहेब म्हस्के
शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त