अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

महाराष्ट्र

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणीला तात्काळ मदतीचा हात दिला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी आपला ताफा थांबवून जखमी तरुणीची विचारपूस केली आणि तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकारी आणि सहकाऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच उपचारात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांनाही रुग्णालयात पाठवून उपचारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

सुनेत्रा पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि माणुसकीच्या भावनेचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याची ही कार्यशैली लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या जनसंपर्काची आठवण करून देणारी असल्याच्या भावना काही नागरिकांनी व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत