मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याकडे राष्ट्रीय संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, विविध विभागांसाठीही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
CJP राष्ट्रीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक – अभिजीत दीपके
सहसंयोजक – आशुतोष रांका, सौरव दास
राष्ट्रीय संघटन प्रभारी – अजिंक्य शिंदे
संघटन सहप्रभारी – दीपक बालियान
राष्ट्रीय सचिव – आफरीन नवाज
मीडिया प्रमुख – विजय रेड्डी मल्लांगी
कायदेशीर प्रकरणांचे प्रमुख – रत्ना सिंह
रिसर्च अँड पॉलिसी प्रमुख – वैष्णवी गौड
तंत्रज्ञान प्रमुख – रोहन देशपांडे
वित्त प्रमुख – योगेश इंगळे
विभागनिहाय प्रभारी :
उत्तर विभाग – दीपक बालियान
दक्षिण विभाग – विजय रेड्डी मल्लांगी
पूर्व व ईशान्य विभाग – अंकित भारद्वाज
पश्चिम विभाग – योगेश इंगळे
या घोषणेनंतर पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्याच्या दृष्टीने विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, देशभरात पक्षाची उभारणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.