स्वस्तिका घोष यांच्या सुवर्णयशाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र

मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात अभिनंदन केले.

स्वस्तिका घोष यांनी आपल्या कौशल्यपूर्ण आणि दमदार खेळाच्या जोरावर प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राची मान उंचावण्याबरोबरच महाराष्ट्राच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे.

स्वस्तिका यांच्या यशाचे कौतुक करत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मेहनत, जिद्द, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मिळविलेले हे यश महाराष्ट्रातील विद्यार्थी तसेच युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यातही स्वस्तिका घोष यांनी देशासाठी अशीच गौरवशाली कामगिरी करत महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत