मानवाचे हृदय एक पोकळ मांसपेशीनी बनलेला शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याचा आकार बंद मूठी एवढा असतो. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्याच हृदयाला प्राणवायू (आँक्सिजन) चा देखिल पुरवठा करतात. प्रत्येक मिनिटाला ७२ वेळा हृदयाचे आकुंचन प्रसारण होत असते. दिवसात एक लाख वेळा आपले हृदय धडकते.
आपला आहार विहार व वयोमानानुसार आपल्या रक्त वाहिन्यात शरीरातील चरबीचे कण जमा होत जातात व त्यामुळेच रक्त वाहिन्यात अवरोध निर्माण होत जातात. या अवरोधामुळेच हृदयाला प्राणवायू व रक्ताचा पुरवठा कमी होतो. रक्त वाहिन्या संकुचित होण्यामुळे ह्रदय विकार होण्याचा धोका निर्माण होतो. हृदय विकारासाठी पुढील कारणेही कारणीभूत असतात. धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, शारीरिक श्रमाचा अभाव, अनुवांशिकता, ताणतणाव, रागीटपणा यामुळे देखील हृदयविकार होतो.
लक्षणे
सामान्यतः छातीच्या मध्य भागात तीव्र वेदना, श्वासोच्छ्वासास त्रास होणे, घाम येणे, मळमळ व चक्कर येणे, वेदना छातीपोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात, तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जातात. ही लक्षणे सुमारे वीस मिनिटा पेक्षा जास्त वेळ टिकतात. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो व रक्तदाब कमी होवून मृत्यु येतो.
हृदयविकारा पासून बचाव
हृदयविकारा पासून ज्यांना धोका आहे किंवा हृदय विकारापासून ज्यांना स्वतः ला वाचवायचे आहे त्यांनी पुढील पाळावेत. आहारात मीठ व चरबीचे प्रमाण कमी असावे. फायबर व कार्बोहायड्रेट्स उच्च मात्रेत असावे. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी वजन कमी करावे. रोज सकाळी शारिरीक व्यायाम करणे गरजेचे असते. धूम्रपान व मद्यपान करीत असल्यास त्वरित बंद करणे. मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल जास्त असेल, तर रोज ची औषधे घेणे.
(सोशल मीडियावरून साभार)