आखाती युद्धावर संसदेतील तातडीची चर्चा घ्या; सुप्रिया सुळे

नवी दिल्ली: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात आर्थिक, सामाजिक व राजकीय अस्थिरता निर्माण होत असून ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या अधिवेशनात तातडीने चर्चा घ्यावी तसेच सर्वपक्षीय बैठक बोलावून परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना ठरवाव्यात, अशी मागणी खासदार Supriya Sule यांनी केली. पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे […]

अधिक वाचा..

धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६! संरक्षण की स्वातंत्र्यावर गदा? महाराष्ट्रात नवा वाद पेटला

मुंबई: राज्य सरकारने सादर केलेल्या ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ मुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. बेकायदेशीर, फसवणूक किंवा सक्तीच्या धर्मांतरांवर आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले असले, तरी त्यातून वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेवर गदा येत असल्याची तीव्र टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही धर्माच्या […]

अधिक वाचा..

फर्निचरच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; डोळ्यात तिखट टाकून धारदार शस्त्राने वार

गडचिरोली: फर्निचर देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील लांझेडा वॉर्डात घडली. या घटनेमुळे गडचिरोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन रामचंद्र कोलूरवार (वय ३५, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव असून महेश महादेव बुरांडे (वय ३४, रा. लांझेडा वॉर्ड, गडचिरोली) […]

अधिक वाचा..

गॅस टंचाईचा फटका मालिकांच्या सेटला; चहा-कॉफीऐवजी लिंबू सरबत

मुंबई: सिनेमा किंवा मालिकांच्या शूटिंग सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी भरपूर खाण्या-पिण्याची सोय असते. अनेकदा दीर्घकाळ शूटिंग असल्यास दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व व्यवस्था निर्मात्यांकडून केली जाते. त्यामुळे सेटवर विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद कलाकारांना मिळत असतो.मात्र सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम थेट मालिकांच्या सेटवरही दिसून येत आहे. काही ठिकाणी जेवण तर दूरच, साधा चहाही मिळणे कठीण […]

अधिक वाचा..

बेकायदा धर्मांतर रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ विधेयक विधानसभेत

मुंबई: बेकायदा व सक्तीच्या धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक शुक्रवारी विधानसभेत मांडले. राज्य मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात या विधेयकाला मंजुरी दिली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचा उद्देश व प्रमुख तरतुदींची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचा कायदा […]

अधिक वाचा..

युद्धाच्या छायेत भारताला दिलासा; होर्मुझ पार करून एलपीजीचे दोन टँकर जहाजे देशात

गुजरात: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे – ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ – इराणजवळील धोकादायक ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सुरक्षितपणे पार करून भारताच्या किनाऱ्यावर पोहोचली आहेत. ‘शिवालिक’ हे जहाज सोमवारी (१६ मार्च २०२६) गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान; महाराष्ट्रात शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह ७ जण बिनविरोध.

नवी दिल्ली: देशातील १० राज्यांमधील रिक्त असलेल्या ३७ राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी २६ जागांवर उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली होती, तर उर्वरित ११ जागांसाठी मतदान घेण्यात आले. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये समझोता झाल्यामुळे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), विनोद तावडे (भाजप) […]

अधिक वाचा..

धर्म स्वातंत्र्य विधेयकावर विधानसभेत जोरदार चर्चा; जितेंद्र आव्हाडांचा विरोध, शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई: राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य (Freedom of Religion) विधेयकावर विधानसभेत सोमवारी जोरदार चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकाचा हेतू सभागृहात स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या विधेयकाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड […]

अधिक वाचा..

चुलत्याकडून पुतणीवर वारंवार अत्याचार; आरोपी अटकेत, ७ दिवस पोलीस कोठडी

पुणे: लोणी काळभोर परिसरात नातेसंबंधांनाच काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या चुलत्याने पुतणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी २२ वर्षीय पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी घरकाम करून आपल्या कुटुंबाचा […]

अधिक वाचा..

फुप्फुसात जमा झालेला कफ झटक्यात येईल बाहेर

सर्दी-खोकला फारच कॉमन समस्या आहेत. पण जर फुप्फुसांमध्ये कफ जमा झाला तर स्थिती फारच गंभीर होते. खोकून खोकून व्यक्तीची हालत खराब होते. छातीत वेदनाही होतात. फुप्फुसात कफ जमा झाल्याने इन्फेक्शन किंवा सीओपीडी आजारही होऊ शकतो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, छातीत जमा झालेला कफ तुम्ही घरातील एक गोष्ट वापरून बाहेर काढू शकता. या आयुर्वेदिक […]

अधिक वाचा..