पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन गरोदर पत्नीला पतीने केलेल्या मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या एरंडवणे भागात एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पत्नीच्या तिच्या पतीच्या विरोधात अलंकार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवी (वय ३५ वर्षे, राहणार एरंडवणे) याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती […]

अधिक वाचा..

अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ईडीची छापेमारी

मुंबई: देशातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. प्रवर्तन निदेशालय (ED) ने आज, गुरुवार, २४ जुलै रोजी मुंबईत अंबानींच्या कंपन्यांशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि त्याचे प्रवर्तक अनिल अंबानी यांना ‘फसवणूक’ करणारे (फ्रॉड) म्हणून घोषित केले होते. याच […]

अधिक वाचा..

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..

निवृत्तीआधीच PF ची संपूर्ण रक्कम काढता येणार, EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

संभाजीनगर: कामगार वर्गासाठी दिलासादायक बातमी! EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था आता PF काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे तुम्हाला 58 वर्षे होईपर्यंत वाट न पाहता PF मधील मोठी रक्कम काढता येणार आहे. सध्याचे नियम काय आहेत पूर्ण रक्कम कधी काढता येते निवृत्ती (58 वर्षांनंतर) 2 महिन्यांहून अधिक बेरोजगारी अधिकृत अपडेटसाठी: […]

अधिक वाचा..

सागरआप्पा दंडवते यांचा अनोखा वाढदिवस साजरा : १५,००० वह्यांचे वाटप व गुणवंतांचा गौरव

शिरूर (अरुणकुमार मोटे): सामाजिक भान, शिक्षणप्रेम व कर्तव्यभावना, खिलाडूवृत्ती जपत युवा उद्योजक सागरआप्पा दंडवते यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत एक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गावातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना १५,००० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्य वाटप; शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापन दिन शिरूर तालुक्यात उत्साहात व सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिरूर शिक्षक समितीच्या वतीने गुरुकुल अनाथ आश्रम, कासारी फाटा (संचालक शिवाजी शिंदे) येथील अनाथ मुलांना किराणा, धान्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात […]

अधिक वाचा..

…तर काँग्रेसला झटका! सतेज पाटलांची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात

कोल्हापूर: काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा काँग्रेसला अधिकच अडचणीत आणणारा आहे. यामुळे […]

अधिक वाचा..

पुण्यातील त्या महिलेवर लैंगिक अत्याचार, गरोदर राहिली पण… 

पुणे: पुण्यात एका महिलेसोबत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर प्रियकराकडून तिची फसवणूक करण्यात आली. पीडितेला तिच्या प्रियकराने लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडिता गरोदर राहिली मात्र, नंतर तिच्या आवडत्या खाद्यपदार्थातून तिला गर्भपाताचं औषध देण्यात आलं आणि गर्भपात करण्यात आला. खिडकी पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात गुन्हा […]

अधिक वाचा..

महसूल विभागाचा दणका! वादग्रस्त पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात

मुंबई: बडतर्फ वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता श्रीमती खेडकर हिला महसूल विभागाने दणका दिला आहे. या दणक्याने खेडकर हिची नियुक्तीच कायमची रद्द होऊ शकते. वादग्रस्त पूजा खेडकर हिला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी त्या बीएमडब्ल्यू या महागड्या गाडीतून कार्यालयात […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! आमदाराच्या भावाचा कलाकेंद्रात गोळीबार?

पुणे: पुण्यातील दौंडजवळच्या अंबिका कला केंद्रात एका राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. कलाकेंद्रात डान्स सुरू असताना हा गोळीबार झाला आहे. गोळीबार करणारा हा एका आमदाराचा भाऊ असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर यांच्यासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अंबिका कला केंद्रात गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार अंबिका कलाकेंद्रात डान्स सुरु होता. […]

अधिक वाचा..