निवृत्तीआधीच PF ची संपूर्ण रक्कम काढता येणार, EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

महाराष्ट्र

संभाजीनगर: कामगार वर्गासाठी दिलासादायक बातमी! EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था आता PF काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे तुम्हाला 58 वर्षे होईपर्यंत वाट न पाहता PF मधील मोठी रक्कम काढता येणार आहे.

सध्याचे नियम काय आहेत

पूर्ण रक्कम कधी काढता येते

निवृत्ती (58 वर्षांनंतर)

2 महिन्यांहून अधिक बेरोजगारी

अधिकृत अपडेटसाठी: https://epfindia.gov.in

आंशिक रक्कम कधी काढता येते

वैद्यकीय खर्च

घर खरेदी/EMI

शिक्षण/ लग्न

1 महिना बेरोजगार – 75%

2 महिने बेरोजगार – 100%

नवीन प्रस्तावानुसार काय बदल होणार

प्रत्येक 10 वर्षांनी PF मधील मोठा हिस्सा काढता येणार

5 वर्षांऐवजी फक्त 3 वर्षांनंतरच 90% रक्कम घरासाठी काढता येणार

UlPI/ATM च्या माध्यमातून 1 लाख रुपये तात्काळ मिळणार

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत स्वयंचलित मंजुरी

डिजिटल प्रक्रिया जलद आणि पारदर्शक

पेन्शन कोणत्याही बँकेतून मिळणार

फायदे काय असतील

मोठ्या गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेण्याची गरज नाही

घर खरेदी, शिक्षण, लग्नासाठी निधी सहज मिळणार

कर्जाचा बोजा आणि व्याज कमी होणार

आर्थिक नियोजन अधिक लवचिक

टीप: कर नियमही लक्षात ठेवा

5 वर्षांपूर्वी काढलेली रक्कम – करयोग्य

PAN दिल्यास 10% TDS, नसल्यास 30% TDS

5 वर्षांनंतरची रक्कम – करमुक्त

तज्ज्ञांचा सल्ला

PF ही निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता आहे, त्यामुळे पूर्ण रक्कम काढताना भविष्यासाठी काही रक्कम शिल्लक ठेवा.