प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द करा

मुंबई: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री . प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना […]

अधिक वाचा..

‘महाज्ञानदीप’ ऑनलाईन पोर्टलचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू मुंबई: डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप’या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे.असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात ‘महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने नाथाभाऊ शेवाळे सन्मानित

कारेगाव (तेजस फडके): जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ यांच्यातर्फे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील आजवरच्या कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. वाय. बी. चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी तेलंगणाचे राज्यपाल महामहीम मा. […]

अधिक वाचा..

बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंडतर्फे नाथाभाऊ शेवाळे यांचा सर्वोच्च सन्मान!

कारेगाव (तेजस फडके): जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या महाराष्ट्रातील आजवरच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड यांच्यातर्फे त्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व KAMKUS, London […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाचा मार्गामध्ये पुन्हा बदल…

पुणे: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि पाणीटंचाईसारख्या समस्यांचा अखेर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून गांभीर्याने विचार झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. मूळ नियोजनानुसार पुणे-शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला ५६ किमी लांबीचा दुमजली उड्डाणपूल वाघोली येथून सुरू होणार होता. मात्र अजित […]

अधिक वाचा..

गुंठेवारीच्या परवानगीसाठी ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, अर्जासाठी लागणार ‘ही’ ३ कागदपत्रे आवश्यक

शहराच्या हद्दीत आलेल्या गावांतील गुंठेवारीच्या जागांना आता अधिकृत मान्यता मिळणार आहे. अनेकांनी नोटरीवर जागा घेतली आणि त्यावर घरंही बांधली, पण परवानगी नसल्यामुळे ती जागा नावावर चढू शकली नाही. आता मात्र ही समस्या दूर होणार आहे. गुंठेवारीसाठी अर्ज कसा करावा? गुंठेवारीसाठी अर्ज करण्यासाठी महापालिकेकडून अर्जदाराची माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. यासाठी महापालिकेच्या अधिकृत अभियंत्यांकडून तयार […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभाग समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी होणार मुंबई: विद्यार्थी हे दैवत असून राज्यातील शासकीय शाळांमध्ये समर्पित वृत्तीने काम करणारे अनेक शिक्षक आहेत. राज्य शासन अशा शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून सर्वच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी केली जाणार असून येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये […]

अधिक वाचा..

गावचा कारभार महिलांच्याच हाती, सोडतीत लागली महिलांच्या नावाची लॉटरी

संभाजीनगर: राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवण्याचे ठिकाण म्हणजे ग्रामपंचायत. राज्यात मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले अनेक नेते याच ग्रामपातळीवरील राजकारणातून पुढे आले आहेत. महिलांना राजकारणात ५०% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रातील एनडीए सरकारने घेतला असला, तरी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या सोडतीत मात्र महिलांची लॉटरी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांचं वर्चस्व फुलंब्री, खुलताबाद आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये १२६ ग्रामपंचायतींमध्ये […]

अधिक वाचा..

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना मुंबई: राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करुन ते 150 रुपयांवरुन 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्राची मान्यता […]

अधिक वाचा..

साळीस्ते येथे 12 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन 

तळेरे: साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता साळीस्ते गुरववाडी चव्हाटा येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने गुरववाडी चव्हाटा येथे श्री सत्यनारायणाची महापूजा […]

अधिक वाचा..