गावचा कारभार महिलांच्याच हाती, सोडतीत लागली महिलांच्या नावाची लॉटरी

महाराष्ट्र

संभाजीनगर: राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवण्याचे ठिकाण म्हणजे ग्रामपंचायत. राज्यात मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले अनेक नेते याच ग्रामपातळीवरील राजकारणातून पुढे आले आहेत.

महिलांना राजकारणात ५०% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रातील एनडीए सरकारने घेतला असला, तरी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या सोडतीत मात्र महिलांची लॉटरी लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांचं वर्चस्व

फुलंब्री, खुलताबाद आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये १२६ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच असतील हे जवळपास निश्चित झालं आहे.

महिला वर्गात यामुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, तर अनेक पुरुष उमेदवारांचं स्वप्न मात्र भंगलं आहे.

फुलंब्री तालुका

७१ ग्रामपंचायतींपैकी ३७ ठिकाणी महिलांची निवड झाली आहे. पाच वर्षांची चिमुकली स्नेहल इधाटे हिच्या हस्ते आरक्षण सोडतीत चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

महत्वाच्या आरक्षण ग्रामपंचायती

अनुसूचित जाती महिला: बिल्डा, शिरोडी, लालवन, वारेगाव

नागरिक मागास महिला: कान्होरी, निधोना, सोनारी बु., खामगाव.

सर्वसाधारण महिला: गणोरी, लोहगड नांद्रा, तळेगाव, वाणेगाव बु, शेवता खुर्द.

खलताबाद तालुका

४० ग्रामपंचायतींपैकी २१ महिला सरपंच होणार आहेत.

सोडतीत उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि तहसीलदार स्वरूप कंकाळ उपस्थित होते.

महत्वाच्या महिला आरक्षित गाव

अनुसूचित जाती महिला: गल्लेबोरगाव, बाजारसावंगी

नागरिक मागास महिला: विरमगाव, खांडी पिंपळगाव, सुलतानपूर.

सर्वसाधारण महिला: पळसवाडी, म्हैसमाळ, देवळाणा, गदाना…

वैजापूर तालुका

सर्वाधिक म्हणजे ६८ ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा सरपंच पदावर कब्जा असणार आहे.

संस्कृती कावळे या मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

महिलांसाठी आरक्षित काही गाव

अनुसूचित जाती महिला: धोंदलगाव, हाजीपुरवाडी, नायगव्हाण वळण

नागरिक मागास महिला: देवगाव शनि, आघूर, शाहजतपूर, साळेगाव.

सर्वसाधारण महिला: भालगाव, घायगाव, हनुमंतगाव, माळीघोगरगाव, टुणकी.

संपूर्ण जिल्ह्यात महिलांचा ‘राज’

हा निर्णय म्हणजे महिलांच्या राजकीय सशक्तीकरणाचं मोठं पाऊल आहे. गावपातळीवर महिलांना मिळालेली ही संधी भविष्यातील नेत्या घडवण्याचं काम करेल.