shivajirao adhalrao patil

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

शिरुर (तेजस फडके): शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळीच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर लोकसभेच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार आहे. महायुतीमध्ये शिरूर […]

अधिक वाचा..

धक्कादायक; फिर्यादीच निघाला खुनातील आरोपी, चुलत भावानेच केला भावाचा खुन…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील बाबुरावनगर येथील श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी नगर-पुणे रस्त्यावर भैरवनाथ कृपा सहकारी गृह रचना मर्यादित शिरुर या ठिकाणी वास्तव्यात असलेले काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मोहताब शाहिद आलम या युवकाचा (दि १८) मार्च 2024 रोजी गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.   शिरुर पोलिसांनी या घटनेच्या तपासाची चक्रे वेगात […]

अधिक वाचा..

लोकसभेच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील बारा गावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार…? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील १२ गावातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असुन येथील पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. मात्र यावर यासर्व गावातील शेतकरी नाराज असुन राजकीय कोणत्याही प्रकारे पाण्याविषयी ठोस भूमिका घेतली नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावातील मतदार काय भूमिका […]

अधिक वाचा..

कारेगाव येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कारेगाव (प्रतिनिधी) कारेगाव (ता. शिरुर) येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असुन याबाबत मुलीच्या वडिलांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.   रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी उंची ५ फुट, रंग गोरा, केस काळे लांब, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने […]

अधिक वाचा..

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या (Shirur Shikshan Prasarak Mandal) कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापकपद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ करत आर्थिक लाभापासून वंचित ठेवुन, दबाव व दमदाटी करुन कोऱ्या दस्तऐवजावर सह्या घेऊन सर्वासमक्ष जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह संस्था सचिव प्रकाश बोरा, शाळा […]

अधिक वाचा..

सावधान; पालकांनो शिरुर मधील इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेताय…तर हि बातमी नक्की वाचा

शिरुर (तेजस फडके) आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या शाळेत शिकावा हे सगळ्याच पालकांचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात आपली मुलं इंग्लिश माध्यमातील शाळेत शिकली तर अजूनच चांगलं त्यासाठी सर्वचं पालक प्रयत्नशील असतात. शिरुर शहरातील अनेक इंग्रजी माध्यमातील शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठी पालक जीवाचा आटापिटा करतात. परंतु शिरुर शहरातील दहा शाळांची सखोल चौकशी केली असता […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच शिरूर मतदारसंघ चर्चेत होता. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि त्यांना अजित पवार यांनी दिलेले आव्हान, यामुळे शिरूरकडे अवघ्या राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात डाव टाकला असून शिरूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा आज सकाळी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये वेश्याव्यवसायासाठी लॉज भाड्याने देणाऱ्या लॉज मालकांवर कारवाई कधी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शिरुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ येथील वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी 12 मार्च 2024 रोजी कारवाई केली होती. तसेच याबाबत पोलिस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन जणांवर गुन्हाही दाखल करण्यात […]

अधिक वाचा..
waghale-yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

वाघाळे (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती गावच्या सरपंच नलिनी थोरात यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली. वाघाळे गावच्या विद्यमान सरपंच नलिनी स्वप्नील थोरात यांच्या अध्यक्षते खाली गावची यात्रा मोठ्या उत्साहात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..