मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: मिरा – भाईंदर येथील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मुंबई महानगर क्षेत्र विकास […]

अधिक वाचा..

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात […]

अधिक वाचा..

आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे

डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

अलकाताई खांडरे ‘विकासाच्या लढतीला नवी चालना’

महाविकास आघाडीचे पक्के पाऊल, जनतेचा प्रचंड प्रतिसाद शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी, स्वच्छ प्रतिमा आणि लोकाभिमुख कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या अलकाताई सुरेश खांडरे यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयाने शिरूरच्या राजकारणात सकारात्मक उत्साह निर्माण झाला असून नागरिकांमध्ये “अनुभवी नेतृत्व पुन्हा मिळणार” अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.अलकाताई खांडरे […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीतील बड्या गटाविरोधात बेट भागात संतापाचे वादळ!

सततची दादागिरी, सुडाचे राजकारण आणि अधिकार्‍यांवरील दबावामुळे जनतेचा संयम सुटला…  शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात टाकळीहाजीतील एका बड्या राजकीय गटाविरोधात असंतोष प्रंचड शिगेला पोहोचला असून आंबेगावातील देव माणूस असलेल्या नेत्याला खोटे सांगून तरुण व नागरिकांना पोलिसांकडून अडकवण्याचा प्रयत्न होत आहे .गावोगावी तरुण आणि नागरिक आता होणाऱ्या त्रासामुळे उघडपणे विरोध व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही […]

अधिक वाचा..

शेवगावात शिवशक्ती आणि जनशक्तीचा संगम, विकासाची नवी ताकद उभी राहणार

जनशक्तीच विजयी होणार, विरोधकांना ‘पेन्शन’ देऊन कायमचे घरी बसवा अहिल्यानगर: शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्याने विकासाची नवी शक्ती निर्माण झाली असून या लढाईत जनशक्तीचाच विजय होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहा, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना वेग येत […]

अधिक वाचा..

प्रोफेशनल काँग्रेसमध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: पल्लवी नायक

अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसचे १५ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान मुंबई: काँग्रेस पक्षात विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग आधीपासूनच आहे परंतु आता प्रोफेशनल काँग्रेस हे एक स्वतंत्र व्यासपीठ असून डॉक्टर, अभियंते, वकील यांच्याबरोबरच खेळाडू, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. १५ डिसेंबपर्यंत सदस्य नोंदणी करून […]

अधिक वाचा..

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी ओबीसी आरक्षणावरील ‘टांगती तलवार’ कायम

भाजप सरकारने ओबीसी समाजाची केली दिशाभूल; विजय वडेट्टीवार चंद्रपूर: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय […]

अधिक वाचा..

शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरण नाशिक: राज्याच्या राजकारणात शिवसेना–भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले शिवसेना–भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे. त्यामुळे ही […]

अधिक वाचा..

निवडणुकीत मतांची खरेदी हा लोकशाहीचे धिंडवडे काढणारा प्रकार; मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मविआत नाराजी नाही; सर्वच पक्षांचा स्वबळाचा निर्णय; कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा मुंबई: नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे. भाजपा महायुतीचे काम ‘पैसा फेक तमाशा देख’ असा असून मंत्रीच जाहीरपणे कबुली देतात याचा अर्थ काँग्रेस […]

अधिक वाचा..