0%
Skip to content
बुधवार, सप्टेंबर 30, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

महाराष्ट्र
ऑगस्ट 15, 2026ऑगस्ट 15, 2026शिरूर तालुका टीम

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या शक्तींनी संविधानाचा स्वीकार करावा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघटनेची नोंदणी करून देणगी कोणाकडून मिळते, याचा हिशोब देशाला द्यावा, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस गुरुचरणसिंग बच्छर, राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे, श्रद्धा ठाकूर, जोजो थॉमस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, देशात संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवले जात असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्यासाठी संघर्ष करत आहेत. राहुल गांधी यांना विविध माध्यमातून त्रास देण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी आपला लढा सोडलेला नाही. त्यांच्या नेतृत्वावर तरुणाईचा विश्वास वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.

‘जाती-धर्माच्या नावावर भेदभाव देशाला शोभणारा नाही’

देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाही जाती-धर्माच्या नावावर भेदभाव केला जात असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कथित ‘शुद्धीकरण’ केले, तरीही संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

देशातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. संघ आणि भाजपच्या विचारांना तिलांजली दिली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

गावपातळीवर काँग्रेस संघटन मजबूत करण्याचा संकल्प

चालू वर्ष हे काँग्रेससाठी संघटन बांधणीचे वर्ष असल्याचे सांगत सपकाळ यांनी राज्यातील गावपातळीवर ग्रामशाखा स्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच मंडळ, ब्लॉक, प्रभाग आणि वॉर्ड अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘लाल किल्ल्यावरूनही खोटे बोल, पण रेटून बोल’

दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. लाल किल्ल्यावरून तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या; मात्र मागील १२ वर्षांत करण्यात आलेल्या घोषणांचे काय झाले, याचा जनतेने विचार करावा, असे ते म्हणाले.

महिला आरक्षणाबाबतही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. महिला आरक्षणाला काँग्रेसचा पूर्वीपासूनच पाठिंबा असून २०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

Tagged Acceptaccountconstitutioncountrycriticizes providedonationsHarshwardhan sapkalSangh

पोस्टचे नॅव्हिगेशन

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा
बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

संबंधित पोस्ट

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

जुलै 3, 2026जुलै 3, 2026शिरूर तालुका टीम

चाकणच्या रस्त्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानात; १६ ऑगस्टला उद्योजकांसोबत बैठक

ऑगस्ट 13, 2026शिरूर तालुका टीम

एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

ऑगस्ट 6, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…
  • ‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार
  • मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा 
  • Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…
  • एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

Popular Categories

  • आरोग्य (2,399)
  • इतर (155)
  • क्राईम (1,732)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (370)
  • मनोरंजन (175)
  • महाराष्ट्र (5,617)
  • मुख्य बातम्या (2,252)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (1,008)
  • शिरूर तालुका (2,922)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…
  • ‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार
  • मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा 
  • Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…
  • एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!