अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल

विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन लातूर: अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावा कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला; मनोज जरांगे पाटील

वडीगोद्री: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.२१) केला आहे. अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला शंका आहे की हा हल्ला तटकरे यांनीच घडवून आणला आहे. यातून त्यांच्या मनातील मराठा द्वेष […]

अधिक वाचा..

राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा; विजय वडेट्टीवार

लातूर: लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकीत जागावाटपामुळेच पराभव; उद्धव ठाकरे

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी आघाडीने निवडणूक आयोग आणि ‘लाडकी बहीण’ योजनेवर खापर फोडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरु राहिली.त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची कबुली शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. आघाडीवर प्रश्‍नचिन्ह सगळ्या गोष्टींत हात […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! विजय घाडगे यांना छातीत कळा, प्रकृती खालावली

लातूर: लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याच्या आरोपावरून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विजयकुमार घाडगे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिंमडळात रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल

लातूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सुरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध […]

अधिक वाचा..

ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या…

पुणे: पुणेकरांचा काही नेम नाही! आखाडचा शेवटचा रविवार असल्यानं सगळीकडं चिकन मटणच्या दुकानाबाहेर रांग आहेच, पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा घेतला जातोय. याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दांपत्याने तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवलाय. ओळखपत्र दाखवायचं आणि चिकन मोफत न्यायचं, असा साधा नियम इथं पाळला जातोय. पण हा हटके […]

अधिक वाचा..

पोलीस महिलेच्या मुलीने केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

नाशिक: सध्याच्या काळात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. नाशिकमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे. पूजा दीपक डांबरे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या आत्महत्येच्या प्रकरणी आडगांव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? आई, तुझी कामामुळे खूप धावपळ होते. तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक […]

अधिक वाचा..

जावई सासरच्या संपत्तीत हक्क सांगू शकतो का?

मुंबई: भारतात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. अनेकदा संपत्तीवरून होणारे वाद-विवाद भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरण न्यायालयात येतात. खरे तर भारतात संपत्ती विषयक कायदे अस्तित्वात आहेत मात्र कायद्यातील सर्वच तरतुदी सर्वसामान्यांना समजत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठा गैरसमज तयार होतो. हेच कारण आहे की आज आपण संपत्तीविषयक कायद्यामधील एका महत्त्वाच्या बागेची माहिती पाहणार […]

अधिक वाचा..

…त्यामुळे पक्षप्रवेश थांबला

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत काल आणि आज दोन भागांमध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या मुलाखतीवर सत्ताधारी पक्षांतील अनेकांनी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. अशात भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टिप्पणी […]

अधिक वाचा..