हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे: महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस श्री. पाटील यांच्यासह तहसिलदार रेवण लेंभे व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून […]

अधिक वाचा..

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन

मुंबई: विधानभवनातील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एकाच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या.महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील विधान भवन परिसरातील […]

अधिक वाचा..

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई: शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी काम करणार असल्याचे […]

अधिक वाचा..

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार; मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे 49 वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला जोर का धक्का…

संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ ठाणे: नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेश झालेल्यामध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक […]

अधिक वाचा..

हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल

आझाद मैदानाच हिंदी सक्तीच्या शासन आदेशाच प्रतीकात्मक होळी करून केला निषेध मुंबई: हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन

जळगाव: खान्देशातील नाट्य क्षेत्रात तब्बल पाच दशकांची वाटचाल असणारे जळगावच्या रंगभूमीवरुन व्यावसायिक रंगभूमीवर जाणाऱ्या अनेक कलावंतांना घडविणारे, सृजनशील लेखक दिग्दर्शक डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या १२ नाटकांच्या संहिताचे पुस्तकरुपाने ३ खंडात प्रकाशन आज (दि.३०) रोजी संपन्न होत आहे. सोमवार दि.३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता व.वा. वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात होणाऱ्या या पुस्तकांचे प्रकाशन प्रयोगशील नाट्य निर्माते […]

अधिक वाचा..

सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडी सरकारचा बहिष्कार

मुंबई: राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय […]

अधिक वाचा..

इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे येथे देशातील पहिल्या इ- ट्रॅक्टरची नोंदणी पार पडली ठाणे: पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिंणी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स […]

अधिक वाचा..