राज्यात आठवड्याभरात वाळू धोरण आणणार, आ. प्रविण दरेकरांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांची घोषणा

मुंबई: सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली असताना राज्यात, विशेषता कोकणात वाळू माफियांकडून सर्रासपणे बंदी मोडून वाळू उपसा सुरू असल्याची गंभीर मुद्दा भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारच्या निदर्शनास आणून दिला. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्यात आठवड्याभरात वाळू धोरण आणणार असल्याची घोषणा केली. विधानपरिषदेत […]

अधिक वाचा..

सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी शासन प्रशिक्षण केंद्र उभारणार का

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व उच्च शिक्षण परीक्षांची तयारी करण्यासाठी शासन सीमा भागात प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला. सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी सीमा भागाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्याना […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश देऊनही बांद्रेकरवाडीतील भुमाफियावर कारवाई नाही

मुंबई: विधानपरिषदेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले कि, मुंबईत जोरजबरदस्तीने जागा हडपण्याचा प्रयत्न काही लँडमाफिया करत आहेत. जोगेश्वरीच्या शुक्ला नावाच्या गुन्हेगारी प्रवृतीच्या भुमाफियाने बांद्रेकरवाडीतील दुसऱ्याची जागा रात्रीचे तीन वाजता पत्रे ठोकून हडप केली. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो. अखेर रात्री राज्याच्या मुख्यमंत्री यांना फोन लावून चर्चा […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंबई बँकेच्या महिलांसाठीच्या योजनेचा आवर्जून उल्लेख

मुंबई: सन २०२५- २०२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बोलताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर अध्यक्ष असलेल्या “मुंबई बँके”चा व महिला सक्षमीकरणासाठी या बँकेच्या योजनेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच यावेळी अजित पवारांनी सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँकांना आवाहन देखील केले. उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रानेही कंबर कसली आहे. त्याचे प्रतिबिंब राज्याच्या अर्थसंकल्पात निश्चित दिसून येत आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा हा अर्थसंकल्प असून महाराष्ट्राचा संतुलित विकास करण्याची क्षमता अर्थसंकल्पात असल्याचा विश्वास आज सन 2025- 26 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला […]

अधिक वाचा..

एमपीएससीच्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्यासाठी अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी […]

अधिक वाचा..

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे, अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा

नाशिकमधील ‘आम्ही साऱ्याजणी’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन नाशिक: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘आम्ही साऱ्याजणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्त्रियांच्या प्रगतीच्या दिशेने चाललेल्या जागतिक आणि स्थानिक […]

अधिक वाचा..

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार

रत्नागिरी: राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर […]

अधिक वाचा..

सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल तुम्हाला माहीत आहे का

मुंबई: मागील 50 वर्षांत पहिल्यांदाच महसूल विभागाने मोठे बदल करून सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि समजण्यास सोपे बनवले असून नवीन सुधारणा केल्यामुळे आता कोणत्याही सामान्य नागरिकाला सातबारा उतारा वाचणे सोपे जाणार आहे! चला, या बदलांचा अधिक सविस्तर आढावा घेऊया सातबारा उताऱ्यात पूर्वी आणि आता काय बदल झाले गावाचा कोड क्रमांक दिसणार आधी फक्त गावाचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा भाजपा युती सरकारचा प्रयत्न

मुंबई: महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना आहे, अशा मंत्र्यांमुळे […]

अधिक वाचा..