वाल्हेकरवाडी, चिंचवड हद्दीत वाजवी किंमतीत व्यापारी गाळे घेण्याची सुवर्णसंधी

पुणे:​ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. 30 वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील Convenience Shopping Center मधील एकूण 31 व्यापारी गाळ्यांची 80 वर्षाकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यासाठी दि.14 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यापैकी तळमजल्यावर 7 व्यापारी गाळे असून त्याकरिता रु.87,100/- प्रति चौ.मी.तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 24 व्यापारी गाळे असून […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीची मोठी अपडेट

औरंगाबाद: राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना नडू नका….

मुंबई: अतिवृष्टी, संततधार यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. त्यात पीक विम्याचा परतावाही शेतकऱ्यांना मिळत नाही. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांना नडू नका असा इशारा पीक विमा कंपन्यांना दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आज आयसी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स […]

अधिक वाचा..

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर एसटी प्रवासाला ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. २६ ऑगस्ट २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान केवळ ८७ दिवसात राज्यभरातून 2 कोटी ०८ लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ […]

अधिक वाचा..

राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी…

मुंबई: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत […]

अधिक वाचा..

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा; राहुल गांधी

जळगाव: भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राच्या जनतेने अपार प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. 14 दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या भूमीने मला दिलेला अनुभव समृद्ध करणारा आहे असे उद्गार काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी काढले. बुलढाणा जिल्ह्रातील आजच्या शेवटच्या सांगता निमखेड येथे झाली. यावेळी […]

अधिक वाचा..

श्री संत ज्ञानोबा तुकोबा यांच्या पादुका चालल्या राम भेटीला सातासमुद्रा पार दुबईला

पुणे: जगाचे केंद्रबिंदू असणारी दुबई येथे सर्वात मोठे हिंदूंचे राम मंदिर असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या मंदिरात भेटीस जाणार असल्याची माहिती दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी दिली आहे. श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन (दि. २०) ते (दि. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालून कार्यवाही करणार…

मुंबई: महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्याप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती आज लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुंबईत दिली. आज मुंबईमध्ये आलेल्या भेटी दरम्यान या विषयावर त्यांनी चर्चा केली डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना आज लेखी निवेदन दिले. तसेच महाराष्ट्रामध्ये […]

अधिक वाचा..

पुण्यात अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्यां पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सोमवारी मांजरी हडपसर येथील संस्थेत थाटात पार पडला. कुठलाही अनाथ मुलगा किंवा मुलगी उपेक्षित आणि वंचित राहु नए यासाठी ईश्वराने सिंधुताईंना अनाथांसाठी देवदूत म्हणून या पृथ्वीवर पाठविले, त्यांच्या हातून ईश्वरीय कार्य घडले, अशी भावना व्यक्त […]

अधिक वाचा..

कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला…

नांदेड: भारत जोडो यात्रेच्या ६२ व्या दिवशी सकाळी एक दुःखद घटना घडली. सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पांडे यांच्या निधनाने काँग्रेसचा एक कट्टर कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पांडे यांच्या […]

अधिक वाचा..