श्री संत ज्ञानोबा तुकोबा यांच्या पादुका चालल्या राम भेटीला सातासमुद्रा पार दुबईला

महाराष्ट्र

पुणे: जगाचे केंद्रबिंदू असणारी दुबई येथे सर्वात मोठे हिंदूंचे राम मंदिर असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या मंदिरात भेटीस जाणार असल्याची माहिती दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी दिली आहे.

श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन (दि. २०) ते (दि. २५) नोव्हेंबर २०२२ या दरम्यान दिंडी आळंदी-पुणे-दुबई-राम मंदिर-बरजुमान-अबुदाबी- शारजा-पुणे-आळंदी अश्या प्रकारे भ्रमण करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जागतिक तत्वज्ञान सामावलेल्या श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथावर अनुवादात्मक ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ सांगून जगाला अंधकार रुपी अज्ञानातून प्रकाशरूपी ज्ञानाकडे सर्वसामान्यांना नेण्याचे कार्य केले.

तसेच ‘जगद्गुरु’ या पदवीला योग्य न्याय देत समाजाला ज्ञान देण्यासाठी पाचवा वेदरुपी ‘अभंग गाथा’ लिहिला असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. संत बहिणाबाईच्या उक्ती प्रमाणे ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे जगातील सकल संतांचे महामेरु श्री संत ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी प्रथमच विदेशी धरतीवर श्री संत ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी सांगितले.

जगाला श्री संत ज्ञानोबा-तुकोबा कळावेत याकरिता स्वच्छ, निर्मल अंतःकरणाने आपण पादुका दिंडीच्या माध्यमातून जगभर भ्रमंती करत आहोत. यावर्षी जगाचे केंद्र बिंदू असणारी ‘दुबई’ येथे दिंडी जाण्याचे निश्चित केले आहे