शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते पाबळ मार्गावरील रस्ता क्रमांक १०३ वरील डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निषेधार्थ निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे दिनांक २ जून पासून ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार संबंधित […]

अधिक वाचा..

स्थगिती आदेश असूनही बांधकाम सुरूच; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नगरपरिषद व बांधकाम व्यावसायिकांचे साटेलोटे उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त अशा शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गट नं. ३०९/१ या ठिकाणी तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश दिला असतानाही, बांधकाम बेधडकपणे सुरूच ठेवण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर; वरुनराजाची कृपा झाली अन अनेक दशकानंतर मे महिन्यात मोटेवाडीचा तलाव तुडुंब भरला

शिंदोडी (तेजस फडके) ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ या म्हणीप्रमाणे यंदा वरुनराजाने संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत दमदार आगमन केल. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी येथील कोरडा पडलेला पाझर तलाव अनेक दशकानंतर मे महिन्यातील वळवाच्या पहिल्याच पावसात ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मोटेवाडीसह चव्हाणवाडी, लंघेवाडी, दुर्गेवस्ती येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.   यावर्षी महाराष्ट्रात लवकरच […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा (अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ) अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करुन त्यांचे मृतदेह पेटवुन दिल्याची घटना रविवार (दि २५) रोजी समोर आली असुन या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून […]

अधिक वाचा..

शिरुर बसस्थानक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन : खड्ड्यात झोपून सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी एक अभिनव आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. शिरूर बसस्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष झोपून त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, बसस्थानकाच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. जुन्या आश्वासनांची पूर्तता न […]

अधिक वाचा..

शिरूर -पाबळ रस्त्यावर धोकादायक खोदकाम; नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका

ठेकेदाराची हलगर्जी अधिकाऱ्यांची डोळेझाक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ-भीमाशंकर राज्यमार्ग क्र. १०३ वरील रामलिंग-तुकाई मळा ओढा परिसराजवळ, रस्त्याच्या कडेने केबल टाकण्याच्या कामासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला अत्यंत धोकादायक पद्धतीने मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. हे खोदकाम कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता पूर्णतः खुले सोडले असून, रात्रीच्या अंधारात हे खड्डे एखादे वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात, मोटारसायकल साठी […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना (दि २४) मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ ३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय 35), रा. […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिलदारांवर चुकीचे व बिनबुडाचे आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाठराखण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथील माती उपसा प्रकरण सध्या तालुव्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात शेतजमिनीतील माती गावातील लोकांनी चोरून नेल्याचा आरोप करत अॅड. फडके यांनी थेट तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तहसिलदारांनी मंडल आधिकारी, तलाठी यांना पंचनामा कराण्याचे आदेश दिले होते. त्यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या नावाने पोलीस ठाणे येथे गुन्हा […]

अधिक वाचा..
bcl-balrangbhumi

बालरंगभूमी क्रिकेट लीगचा ३० व ३१ मे रोजी रंगणार थरार…

शिरूर : क्रिकेट हा खेळ संघभावना वाढविणारा खेळ आहे. बालरंगभूमी परिषद सातत्याने लहान बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करीत असते. मात्र हे उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांकरिताही उपक्रम राबवावेत या उद्देशातून तसेच त्यांच्यातील संघटनकौशल्य वाढण्यासोबत त्यांच्या शारीरिक आरोग्यवाढीसाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून दि. ३० […]

अधिक वाचा..
jayant-naralikar

डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या आठवणींना उजाळा…

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यात आला. पुणे येथील “लोकबोधिनी” या सामाजिक संस्थेतर्फे १२ ते १४ जानेवारी १९९७ रोजी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि.मा. बाचल यांच्या हस्ते झाले होते. […]

अधिक वाचा..