ranjana-kale-nimgaon

निमगाव म्हाळुंगी येथील माजी उपसरपंच रंजना काळे यांचे निधन

निमगाव म्हाळुंगी: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावच्या माजी उपसरपंच रंजना बबनराव काळे (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (ता. ६) निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये त्यांच्यावर सोमवारी (ता. ७) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रंजना काळे यांनी १९९० ते १९९५ यादरम्यान गावचे […]

अधिक वाचा..

मलठणच्या शिंदेवाडीतील आठ कुटुंबांची बांधकाम व्यावसायिकांकडून लाखोंची फसवणूक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठणच्या शिंदेवाडी, वरुडे आणि निमगाव दुडे येथील आठ कुटुंबांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावातील चार कॉन्ट्रॅक्टर्सकडून तब्बल ५५.९१ लाखांची फसवणूक झाल्याची गंभीर तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, वैजनाथ मोहिते, अजय पवार, नामदेव पवार आणि मोहन चव्हाण या चौघांनी गावात आठ ते नऊ महिने वास्तव्य करून घरबांधणीची […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेजाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस पेटून ५० हजार रुपयांचे नुकसान

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्रीने दहशत; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्री घेऊन तिघांनी दहशत माजवत एका व्यक्तीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “आमच्याविरोधात तहसील कार्यालयात तक्रार करतोस का?” असे म्हणत तिघांनी एकावर हल्ला केला असून, याप्रकरणी तिघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात संतोष बाळू पाचर्णे (वय ४२) व्यवसाय […]

अधिक वाचा..

रामनवमीच्या शुभपर्वावर ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’चे नूतनीकरण, शिरूरच्या सेवाभावी इतिहासाला उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामनवमीच्या पावन दिवशी शिरूर शहरात समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि राजकारण यांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे यांच्या सन्मानार्थ नामित ‘डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’च्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले. या प्रसंगाने शिरूरच्या सेवाभावी परंपरेला उजाळा देत नव्या पिढीला प्रेरणादायी वारसा पुढे नेण्याची साक्ष पटवली. शहराच्या सेवाभावी इतिहासाचे अधिष्ठान: डॉ. बाळासाहेब नरवडे हे […]

अधिक वाचा..

तर बापुसाहेब शिंदे भविष्यात शिरुरचे आमदारही होऊ शकतात; आमदार शरद सोनवणे यांचं भाकीत

कारेगाव (तेजस फडके) ‘बापुसाहेब तुमचं काम चालु ठेवा. गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही कायमच पुढाकार घेत असता. भविष्यात तुम्ही शिवसेनेचे शिरुर तालुक्यातीलच नव्हे महाराष्ट्राचे मोठे नेते असाल. तसेच सन २०२९ मध्ये पक्षाने आणि जनतेने संधी दिली तर कदाचित तुम्ही शिरुरचे आमदारही होऊ शकता असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले.   पुढे बोलताना आमदार […]

अधिक वाचा..

महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने ओढून नेणाऱ्या चोरट्यांचा अखेर पर्दाफाश

शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, पाच गुन्ह्यांचा उलगडा शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा शिरूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अखेर छडा लावत परजिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपी अटकेत असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या टोळीने शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल पाच गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. […]

अधिक वाचा..

जलशुद्धीकरण प्रकल्प की कचरा डेपो, आमदार माऊली आबांचा संतप्त सवाल 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगर परिषदेचा जलशुद्धीकरण प्रकल्प जो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या तो प्रचंड दुर्दशेला सामोरा जात आहे. स्वच्छतेचा अभाव, देखरेखीची कमी आणि यंत्रणांची मोडतोड यामुळे संपूर्ण केंद्रच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी अचानक दौरा करून केंद्राची पाहणी केली आणि प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर […]

अधिक वाचा..

व्हिसेरा उशिरा जमा प्रकरण: चौकशीची मागणी होताच पोलीस अधिक्षक कार्यालयात हालचाल सुरू, सुत्रांची माहीती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुचर्चित खुनप्रकरणातील व्हिसेरा तब्बल आठ महिने उशिरा रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्याची गंभीर बाब उघड झाल्यानंतर पोलिस अधिक्षक विभागात हालचाली सुरू झाल्या आहेत.खुण झाल्यापासून आत्तापर्यंत शिक्रापूर पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. या प्रकरणात संबंधित तपासी अधिकारी, तसेच पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी व्हावी, अशी […]

अधिक वाचा..
school-teacher

एन.एम.एम.एस. परीक्षेत कालिकामाता विद्यालय वाघाळेचे घवघवीत यश!

वाघाळेः केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालयाने बाजी मारली आहे. कालिकामाता विद्यालयाचे 15 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थिनीस केंद्र शासनामार्फत 12 हजार रुपये प्रतिवर्ष असे चार वर्षात एकूण […]

अधिक वाचा..