मुख्य बातम्या

Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे

तळेगाव ढमढेरे (तेजस फडके): महाराष्ट्रात सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुनामी आलेली असल्याने महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, असे सांगितले याचा अर्थ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, हे नक्की. शिवाय, गुलाबी रंगाने महाराष्ट्राचा गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, असे टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

शिरुर-हवेली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरे येथील सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, सरचिटणीस ज्ञानेश्वर थेऊरकर, बाळासाहेब नरके, शिवंसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पोपट शेलार, माजी उपसभापती जयमाला जकाते आदी उपस्थित होते.

अमोल कोल्हे म्हणाले, ‘गुलाबी रंगाने महाराष्ट्राचा गद्दारीचा कलंक झाकला जात नाही असा टोला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावत शेतकऱ्यांच्या पिकला मिळणाऱ्या हमीभाव तसेच शेतकरी आत्महत्या बाबत सरकारवर ताशेरे ओढले. घोडगंगा कारखान्याचा विषय काढून अशोक पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतून दादा, शिंदे व फडणवीस यांना सत्तेतून पायउतार करा. पुणे जिल्ह्यातील अनेकजण शरद पवार यांना सोडून गेले. मात्र, अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने राज्याचे लक्ष या उमेदवारीवर लागले आहे.’

अशोक पवार म्हणाले, आज तालुक्यातील सर्व पुढारी व गँगमधील सर्वजण मला पराभूत करण्यासाठी एकत्र झाले आहेत. मात्र, माझा जनतेवर माझा विश्वास आहे.’

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

10 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

17 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

17 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

17 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

18 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

19 तास ago