लसणाचं तेल लावण्याचे फायदे 

आरोग्य महाराष्ट्र

लसणाचं तेल हा वापरला जाणारा एक घरगुती उपाय आहे. यामध्ये लसूण, हिंग, ओवा, मोहरीचं तेल एकत्र कढवून बनवले जाते. या तेलात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात, जे सांधेदुखी, कंबरदुखी आणि मुरगळलेल्या स्नायूंवर उपयुक्त ठरतात.

१) कंबरदुखीवर आराम: या तेलाने मालिश केल्याने कंबरेची दुखणी हळूहळू कमी होतात.

2) गुडघेदुखी कमी होते: हिंग आणि ओव्याचे उष्ण गुणधर्म सांध्यांतील वेदना कमी करतात.

3) पाय मुरगळल्यास: मुरगळलेल्या स्नायूंवर हे तेल लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात.

4) स्नायूंना उब मिळते: मोहरीचं तेल आणि लसणाच्या मिश्रणामुळे शरीराला उब मिळते, जी दुखण्यावर उपयुक्त ठरते.

5) रक्ताभिसरण सुधारते: नियमित तेल लावल्याने त्या भागातील रक्ताभिसरण चांगले होते व दुखणे लवकर कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)