कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जीवनात विषासारखा बनतो. पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र, इतर गोष्टी प्रमाणेच पाण्याच्या अतिसेवनाचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. आवश्यकते पेक्षा जास्त पाणी प्यायल्याने रक्ताचे प्रमाण वाढते आणि जास्त पाणी फिल्टर करण्यासाठी किडनीवर दबाव वाढतो. यामुळे हृदयावर अधिक भार पडू शकतो आणि पोटात जळजळ वाढू शकते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडते आणि रक्तातील सोडियमची पातळी कमी होते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती निर्माण होते. या लक्षणांमध्ये मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा, चिडचिड, स्नायू पेटके इ. समस्या निर्माण होण्याची भीती असते.
दिवसासाठी किती पाणी आवश्यक
निरोगी व्यक्तीने दररोज सुमारे ९ ते १३ कप पाणी प्यावे.
जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम
१) हायपोनाट्रेमिया: जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते. या स्थितीलाच हायपोनेट्रेमिया म्हणतात. हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना हायपोनेट्रेमियाचा धोका जास्त असतो.
२) स्नायू मध्ये जळजळ: जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाईट्स पातळ होतात, ज्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. शरीरात सोडियमचे प्रमाण कमी असल्याने स्नायू मध्ये क्रॅम्प सारख्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
३) वारंवार लघवी होणे: जास्त पाणी प्यायल्याने लघवी जास्त होते. कारण जास्त पाणी प्यायल्यावर किडनीला सतत काम करावे लागते. तसेच, वारंवार लघवी केल्याने किडनीवर जास्त ताण पडतो.
४) अतिसार: ओव्हरहायड्रेशन मुळे हायपोक्लेमिया होतो किंवा शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. यामुळे खूप वेळ जुलाब होते आणि घाम येतो. हायपोक्लेमिया बहुतेकदा पाचन तंत्रावर थेट परिणाम करते, त्यामुळे उलट्या, जुलाब अशा समस्या उद्भवतात.
(सोशल मीडियावरून साभार)